चंद्रावर पोहोचणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू; म्हणाला, चांद पे है अपून!

इतकंच नव्हे तर चंद्रावर जाऊन या खेळाडूने सोशल मीडियावर फोटोही शेअर केला आहे.

Updated: Mar 3, 2022, 11:06 AM IST
चंद्रावर पोहोचणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू; म्हणाला, चांद पे है अपून! title=

मुंबई : चंद्रावर जाणं ही काही खाऊची गोष्ट नाही. मात्र टीम इंडियाच्य़ा या पठ्ठ्यासाठी चंद्रावर पोहोचणं काही कठीण गोष्ट नाहीये. सध्या दुखापतीने ग्रस्त असून टीमबाहेर असलेला केएल.राहुल थेट चंद्रवारीवर निघाल्याचं समजतंय. इतकंच नव्हे तर चंद्रावर जाऊन त्याने सोशल मीडियावर फोटोही शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये केएलने चांद पे है अपून असं म्हटलं आहे.

काय आहे नेमकं सत्य

दरम्यान केएल राहुलने काही त्याचे फोटो एडिट करून एक पोस्ट केली आहे. चाहत्यांसाठी त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. राहुलने हा फोटो पोस्ट करताच त्याच्या फॅन्सने देखील कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने लोकप्रिय बेव सिरीज 'Sacred Games'चा डायलॉगसोबत ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. 'Sacred Games'मधील मुख्य भूमिकेत असलेल्या गणेश गायतोंडे याचा दुसऱ्या सिझनमधील हा डायलॉग फार गाजला होता. गेल्य़ा काही दिवसांपासून राहुल सोशल मीडियावर बराच एक्टिव्ह दिसतोय.

इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सिझनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. लखनऊची टीम पहिल्यांदाच आयपीएलमध्ये मैदानात उतरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष या टीमवर असणार आहे.