मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजआधी रेकॉर्ड खुणावत आहे. कोहलीनं वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ९,७७९ रन केले आहेत. १० हजार रन पूर्ण करायला विराटला आणखी २२१ रनची गरज आहे. सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराटला ५ मॅचमध्ये हे रेकॉर्ड करणं सोपं जाईल, असंच म्हणावं लागेल. विराटनं १० हजार रन पूर्ण केले तर तो सगळ्यात कमी इनिंगमध्ये हा पल्ला गाठणारा पहिला क्रिकेटपटू ठरेल. सध्या हे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरनं २५९ इनिंगमध्ये १० हजार रन केले होते. विराटनं २११ मॅच आणि २०३ इनिंगमध्ये ९.७७९ रन केले आहेत. विराटच्या आधी जगभरातल्या १२ खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन केले आहेत. यातले ४ बॅट्समन भारताचे आहेत. सचिन तेंडुलकर(१८,४२६), सौरव गांगुली(११,३६३), राहुल द्रविड(१०,८८९) आणि महेंद्रसिंग धोनी(१०,१२३) या भारतीयांनी वनडेमध्ये १० हजार रन केले आहेत.
धोनीनं भारताकडून खेळताना वनडेमध्ये ९,९४९ रन केले आहेत. त्यामुळे भारताकडून १० हजार रनचा टप्पा गाठायला त्याला अजून ५१ रनची आवश्यकता आहे. धोनीनं २००७ साली आशियाई अकरा टीमकडून खेळताना आफ्रिका अकरा टीमविरुद्ध ३ मॅचमध्ये १७४ रन केले होते. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये धोनीनं वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रनचा टप्पा गाठला.
विराट कोहलीला स्वदेशात ४ हजार रन पूर्ण करायला १७० रनची आवश्यकता आहे. सचिन तेंडुलकर (६,९७६) आणि धोनी(४,२१६) या दोघांनी भारतामध्ये हे रेकॉर्ड आधीच केलं आहे. जगात फक्त ९ बॅट्समननी त्यांच्या मायदेशात ४ हजारपेक्षा जास्त रन केले आहेत.
विराट कोहलीनं २०१८मध्ये आत्तापर्यंत ७४९ रन केले आहेत. विराट सहाव्यांदा एका वर्षात १ हजार रन करण्याचा प्रयत्न करेल.