IND vs SL : विराट कोहलीचा 'भीमपराक्रम'! 'हा' मोठा रेकॉर्ड ब्रेक

Virat kohli enter in Top 5: विराट कोहलीने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळताना श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

Updated: Jan 15, 2023, 05:17 PM IST
IND vs SL : विराट कोहलीचा 'भीमपराक्रम'! 'हा' मोठा रेकॉर्ड ब्रेक  title=

Virat kohli enter in Top 5: श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मोठा रेकॉर्ड केला आहे. विराट कोहलीने सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे विराटने श्रीलंकेविरूद्ध खेळताना श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. 

63 धावा करून रेकॉर्ड ब्रेक 

विराट कोहलीला फक्त 63 धावा करायच्या होत्या. या धावा करून तो दिग्गज खेळाडूंच्या पक्तीत स्थान मिळवणार होता. हा योग तिसऱ्या वनडे सामन्यात जूळून आला. त्याने 63 धावा करताच, तो वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल 5 मध्ये पोहोचला. विराटने श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेला मागे टाकत टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. महेला जयवर्धनेने एकदिवसीय सामन्यांमध्ये 448 सामन्यात एकूण 12,650 धावा केल्या आहेत. विराटने 268 सामन्यात या धावांचा आकडा पुर्ण करत दिग्गज खेळाडूंच्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. 

वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

  • 1. सचिन तेंडुलकर - 463 सामने, 18426 धावा
  • 2. कुमार संगकारा - 404 सामने, 14234 धावा
  • 3. रिकी पाँटिंग - 375 सामने, 13704 धावा
  • 4. सनथ जयसूर्या - 445 सामने, 13430 धावा
  • 5. विराट कोहली - 268 सामने - 12651* (चालू)