IND vs SL 3rd ODI: LIVE सामन्यात धक्कादायक घटना; श्रीलंकेचे 2 खेळाडू बेक्कार धडकले, स्ट्रेचरसहित डॉक्टर मैदानावर!

India vs Sri Lanka : विराटने खेळलेला शॉट अडवण्यासाठी जेफ्री वँडरसे (Jeffrey Vandersay) आणि अॅशेन बंदारा (Ashen Bandara) हे दोन्ही खेळाडू धावले. त्यावेळी

Updated: Jan 15, 2023, 05:23 PM IST
IND vs SL 3rd ODI: LIVE सामन्यात धक्कादायक घटना; श्रीलंकेचे 2 खेळाडू बेक्कार धडकले, स्ट्रेचरसहित डॉक्टर मैदानावर! title=
Jeffrey Vandersay, Ashen Bandara

Jeffrey Vandersay and Ashen Bandara: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज (IND vs SL ODI series) खेळवली जातेय. या सिरीजमधील शेवटचा सामना ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम (Greenfield International Stadium) वर खेळवला जातोय. या सामन्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीलंकेचे जेफ्री वँडरसे (Jeffrey Vandersay) आणि अॅशेन बंदारा (Ashen Bandara) हे दोन खेळाडू एकमेकांना धडकून जखमी झाले आहे. त्यामुळे काही वेळ सामना थांबवावा लागला. (Jeffrey Vandersay and Ashen Bandara injured in IND vs SL 3rd ODI marathi news)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय टीम इंडियासाठी खूप फायदेशीर ठरला. मात्र टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन चांगल्या लयीत दिसत होता, मात्र त्याचवेळी त्याने स्वतःची विकेट गमावली. श्रीलंकेचे जेफ्री वँडरसे आणि अॅशेन बंदारा हे दोन खेळाडू जखमी (Sri Lanka Players injured) झाले आहे.

पाहा Video -

झालं असं की, टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli Century) शतकाच्या जवळ होता. विराट 98 वर खेळत असताना त्याने पुल शॉट खेळला. त्यावेळी विराटने खेळलेला शॉट अडवण्यासाठी जेफ्री वँडरसे (Jeffrey Vandersay) आणि अॅशेन बंदारा (Ashen Bandara) हे दोन्ही खेळाडू धावले. त्यावेळी बॉन्ड्री लाईनवर दोघांची धडक झाली आणि दोघांना जबर मार बसला.

आणखी वाचा -I ND vs SL : विराट कोहलीचा 'भीमपराक्रम'! 'हा' मोठा रेकॉर्ड ब्रेक

दरम्यान, धडक झाल्यानंतर बराच वेळ जेफ्री वँडरसे (Jeffrey Vandersay) आणि अॅशेन बंदारा (Ashen Bandara) दोघेही उठले नाही. त्यामुळे दोघांना चांगलाच मार बसलाय, याची जाणीव झाल्यानंतर डॉक्टरांनी लगेच मैदानात धाव घेतली. त्यानंतर स्ट्रेचरवरून (Stretcher) दोघांना पवेलियनमध्ये नेण्यात आलं. काही वेळानंतर सामना सुरू झाला. त्यानंतर पुढच्याच बॉलवर विराटने सेच्युरी (Virat Kohli) साजरी केली.