दुबईत विराट-अनुष्काने साजरा केला आनंद

प्रेग्नेसीचं सेलिब्रेशन सुरूच 

Updated: Aug 31, 2020, 03:05 PM IST
दुबईत विराट-अनुष्काने साजरा केला आनंद title=

मुंबई : स्टार कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लवकरच आई-बाबा होणार आहेत. काहीच दिवसांपूर्वी या दोघांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. दुबईत हे दोघं आपला आनंद खास लोकांसोबत साजरा करत आहेत. 

विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्ये सहभागी होण्यासाठी दुबईत गेला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलौर (RCB) या संघातून विराट खेळत आहे. यावेळी त्याच्यासोबत अनुष्का देखील दुबईत गेली आहे. 

यावेळी या दोघांनी केक कापून आपला आनंद साजरा केला. अनुष्काने यावेळी ब्राऊन शॉर्ट ड्रे घातला आहे. यावेळी अनुष्काच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद अतिशय स्पष्ट दिसत आहे. यावेळी विरुष्काने केक कापून आनंद व्यक्त केला. 

यावेळी खेळाडू युजवेंद्र चहलने देखील केक कापला. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर धनश्री वर्मासोबत साखरपुडा केल्याचा आनंद व्यक्त केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And then, we were three! Arriving Jan 2021

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी कपल म्हणून अनेकांच्याच नजरा वळवणाऱ्या अभिनेत्री anushka sharma अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार, जागतिक ख्यातीचा क्रिकेटपटू virat kohli विराट कोहली यांच्या नात्यात आता एक अत्यंत महत्त्वाचं वळण आलं आहे. हे वळण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी घेऊन आल्याचं दिसत आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. अनुष्का आणि विराट या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो पोस़्ट करत गोड बातमी दिली आहे. ही बातमी आहे या दोघांच्या नात्यात येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीची. म्हणजेच एका नव्या पाहुण्याची. विरुष्कानं शेअर केलेली पोस्ट पाहता बी- टाऊनच्या या अभिनेत्रीला मातृत्त्वाची चाहूल लागल्याचं स्पष्ट होत आहे.