'...बरं वाटत नाहीये'; T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर विराटचे 10 वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल

भारताच्या पराभवानंतर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीचे 10 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे

Updated: Nov 11, 2022, 07:44 AM IST
'...बरं वाटत नाहीये'; T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर विराटचे 10 वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल title=

Ind vs Eng T20 WC : टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा (ind vs eng) एकतर्फी सामन्यात 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. भारतीय क्रिकेट संघाना नऊ वर्षानंतरही उपांत्य फेरीचा (semi final) अडथळा दूर करण्यात अपयश आलयं. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भारतीय संघाने अतिशय निराशाजनक कामगिरी केलीय. अ‍ॅलेक्स हेल्स (alex hales) आणि जोस बटलर (jos buttler) यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने सेमीफायनमध्ये भारताचा 10 गडी राखून पराभव केला. यामुळे आता भारत-पाकिस्तान (ind vs pak) अंतिम सामन्याच्या आशा संपल्या आहेत. (Virat Kohli 10 year old tweet went viral after being ruled out of T20 World Cup)

या पराभवानंतर भारतीय संघावर चहुबाजूंनी टीका करण्यात येतेय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधार पदावरुनही त्याला लक्ष्य केले जात आहे. इंग्लंडच्या डावात भारतीय संघाला (Team India) एकही विकेट घेता न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येतेय. मात्र दुसरीकडे विराट कोहलीच्या (virat kohli) वर्ल्ड कपमधील फॉर्मचे जौरदार कौतुक होतय. अशातच टी- 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर विराटचे 10 वर्षांपूर्वीचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये कोहलीच्या वेदना स्पष्टपणे दिसत आहेत.

विराट कोहलीने हे ट्विट 20 मार्च 2012 रोजी भारतीय संघ आशिया कप 2012 मधून बाहेर गेल्यानंतर केले होते.  'उद्या घरी जाणार आहोत, हे चांगलं वाटत नाहीये,' असे विराटने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीचा फॉर्म परतला आहे. कोहलीने 4 अर्धशतकांसह 296 धावांसह स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवलाय. इंग्लंडची अंतिम फेरीत पाकिस्तान संघाशी लढत होणार आहे. पण या दोन संघातील एकही फलंदाज सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या पाचमध्येही नाही. त्यामुळे या स्पर्धेत कोहलीच सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरणार आहे. कोहलीने 2014 आणि 2016 मध्येही हा पराक्रम केला होता.