विराटने मोडला सचिन आणि लाराचा आणखी एक रेकॉर्ड

विराट कोहलीचा आणखी एक रेकॉर्ड

Updated: Jan 3, 2019, 11:36 AM IST
विराटने मोडला सचिन आणि लाराचा आणखी एक रेकॉर्ड title=

सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आजपासून चौथा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये गहा सामना सुरु आहे. विराट कोहलीने टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय़ घेतला आहे. सर्वश्रेष्ठ खेळाडू विराट कोहलीने आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. रनची मशीन म्हटल्या जाणाऱ्या विराटने सचिन आणि लाराचा रेकॉर्ड मोडला आहे. 

मयंक अग्रवालच्या विकेटनंतर मैदानात आलेल्या विराटने आणखी एक शानदार रेकॉर्ड केला आहे. आज ११ रन करताच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार रन पूर्ण केले आहेत. सर्वात जलद १९ हजार रन करण्याचा हा रेकॉर्ड आहे. वनडे, टेस्ट आणि टी-२० मध्ये एकूण ३९९ इनिंगमध्ये त्याने हा कारनामा केला आहे. 

कोहलीने १९ हजार रनचा आकडा गाठताच त्याने महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४३२ इनिंगमध्ये १९ हजार रन पूर्ण केले होते. याआधी विराटने सर्वात जलद १५ हजार, १६ हजार,१७ हजार आणि १८ हजार रन देखील केले आहेत. लाराने १८ हजार रन ४११ इनिंगमध्ये पूर्ण केले होते.

भारतीय टीम सिडनी टेस्टमध्ये २-१ च्या आघाडीसह मैदानात उतरली आहे. भारताला सिरीज जिंकण्यासाठी हा सामना जिंकणं आवश्यक आहे. भारताने जर ही सिरीज जिंकली तर ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर जिंकली गेलेली ही पहिली सिरीज असेल. अनेक वर्षांचा रेकॉर्ड यामुळे मोडला जावू शकतो. भारतीय टीमकडे ही मोठी संधी आहे.