मयंक अग्रवालच्या शानदार खेळीचं कौतुक, पण बॅट पाहून लोकांनी व्यक्त केली नाराजी

मयंक अग्रवालची बॅट पाहून अनेक जण नाराज

Updated: Jan 3, 2019, 01:02 PM IST
मयंक अग्रवालच्या शानदार खेळीचं कौतुक, पण बॅट पाहून लोकांनी व्यक्त केली नाराजी title=

सिडनी : मेलबर्नमध्ये आपल्या टेस्ट करिअरची सुरुवात करणाऱ्या मयंक अग्रवालने सिडनीमध्ये देखील आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच खूश केलं. सिडनी टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने शानदार अर्धशतक ठोकलं. मयंकने ९६ बॉलमध्ये आपल्य़ा टेस्ट करिअरमधलं दुसरं अर्धशतक ठोकलं. मयंकची ही इनिंग खूप खास ठरली. कारण टीम इंडियाने एल राहुलला दुसऱ्या ओव्हरमध्येच गमवलं. अशावेळी मयंक अग्रवालने जबाबदारी घेत एका बाजुने भारतीय टीमची बाजू धरुन ठेवली.

मयंक अग्रवालने मिचेल स्टार्क, पॅट कमिंस आणि जोश हेजलवुड यांच्या बॉलिंगवर शानदार खेळ दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या या तिन्ही गोलंदाजांनी मयंकला बाउंसर्स टाकले पण त्याने त्यावर अनेक चांगले शॉट्स खेळले. मयंक अग्रवालने शानदार ७७ रन केले. मयंकच्या या इनिंगनंतर सोशल मीडियावर त्याचं कौतूक होतं आहे. दुसरीकडे त्याची बॅट पाहून अनेकांनी खेद देखील व्यक्त केला.

मयंक अग्रवाल ज्या बॅटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत आहे. त्या बॅटवर कोणतंच स्टीकर नाही. याचा अर्थ त्याला कोणीच स्पॉनर्स केलेलं नाही. फॅन्सच्या मते, मयंक अग्रवालच्या इतक्या चांगल्या टॅलेन्टनंतरही  त्याला स्पॉनर्स मिळालेले नाही. त्यामुळे चाहत्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.