विराट-अनुष्का सुरु करणार कोरोना विरुद्ध अभियान, व्हिडिओ शेअर करुन दिली माहिती

कोरोना विरुद्ध आता विराट आणि अनुष्काचा पुढाकार

Updated: May 2, 2021, 07:36 PM IST
विराट-अनुष्का सुरु करणार कोरोना विरुद्ध अभियान, व्हिडिओ शेअर करुन दिली माहिती title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच आपला 33 वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास प्रसंगी अनुष्काला तिच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी शुभेच्छा. त्यानंतर अनुष्काने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. या व्यतिरिक्त तिने हे देखील सांगितले की लवकरच ती आणि विराट कोरोनाविरूद्धच्या लढ्यात नवीन मोहीम सुरू करणार आहेत.

अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्काने म्हटलं की, 'मला आशा आहे की तुम्ही सर्व सुरक्षित आहात. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. तुम्ही माझा दिवस खरोखर खास बनवला पण अशा कठीण काळात माझा वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटले नाही. पण मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण संदेश देऊ इच्छित आहे.'

पुढे अनुष्का म्हणाली की, 'मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो की ही वेळ एकत्र येण्याची आणि शक्य तितक्या लोकांना मदत करण्यासाठी आहे. मला सांगायचे आहे की, मी आणि विराट एकत्र प्रयत्न करीत आहोत आणि कोरोनाविरूद्धच्या या लढाईत लवकरच तुमच्याबरोबर उभे राहणार आहोत. मी लवकरच आपल्याशी संबंधित सर्व माहिती शेअर करेन, तोपर्यंत घरीच रहा आणि स्वतःची काळजी घ्या.'

अनुष्का शर्माचा हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करून त्याचे चाहते त्यांचे कौतुक करत आहेत. लोक म्हणतात की, अनुष्का खूप विचारशील आहे. तसेच अनुष्का आणि विराटच्या मोहिमेची वाट पाहत असल्याचेही बरेच लोक सांगत आहेत.