IND vs AUS: "10 रुपये की पेप्सी, वॉर्नर भाई..." अन् LIVE सामन्यात प्रेक्षकांनी घेतली वॉर्नरची फिरकी, Viral Video

India vs Australia: वॉर्नरची (Warner ) दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आगामी सामन्यात तो खेळणार नसल्याचं समोर आलंय.

Updated: Feb 19, 2023, 07:45 PM IST
IND vs AUS: "10 रुपये की पेप्सी, वॉर्नर भाई..." अन् LIVE सामन्यात प्रेक्षकांनी घेतली वॉर्नरची फिरकी, Viral Video title=
David Warner

IND vs AUS, Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs australia) यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात (IND vs AUS) टीम इंडियाने 6 विकेटने दणदणीत विजय नोंदवला. हा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता आणखी एक सामना जिंकताच टीम इंडिया (Team India) मालिका खिशात घालणार आहे. गेल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून काही खास कामगिरी होताना दिसत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियान संघावर टीका होताना दिसत आहे. अशातच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सिराजने दिवसाच्या सुरुवातीपासूनच डेव्हिड वॉर्नरवर (David Warner) बाऊन्सरचा वर्षाव केला. 10 व्या षटकातील एक चेंडू वॉर्नरच्या हेल्मेटला लागला आणि दुसरा चेंडू त्याच्या उजव्या कोपराला लागला. त्यामुळे वॉर्नरला दुखापतीचा (David Warner injury) सामना करावा लागलाय. त्यामुळे तो दुसऱ्या डावात मैदानात उतरला नाही. मात्र, त्याआधीचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.

आणखी वाचा - IND vs AUS: KL Rahul च्या उपकर्णधारपदाबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता सुट्टी नाही...

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये (David Warner Video) वॉर्नर फाईन लेगला फिल्डिंग करताना दिसत आहे. त्यावेळी प्रेक्षकांनी वॉर्नरची मज्जा घेतली. 10 रुपये की पेप्सी, वॉर्नर भाई सेक्सी, अशा (10 Rupee ki Pepsi Warner Bhai sexy) घोषणा यावेळी प्रेक्षकांनी दिल्या आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल (Trending Video) होताना दिसत आहे.

पाहा Video - 

दरम्यान, वॉर्नरची दुखापत गंभीर असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आगामी सामन्यात तो खेळणार नसल्याचं समोर आलंय. त्यानंतर चौथ्या सामन्यात वॉर्नर खेळणार की नाही? याबाबत शाश्वती देता येणार नाही. अशातच टीम इंडियाचं काम आता सोप्प झालंय.

IND vs AUS: टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा - (India’s Test squad for third and fourth Test)

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.