बजरंग पुनिया, विनेश फोगटची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरण आणि पूजा धांडा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Updated: Apr 29, 2019, 08:20 PM IST
बजरंग पुनिया, विनेश फोगटची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस title=

नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांची भारतीय कुस्ती संघटनेकडून राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे, हरप्रीत सिंग, दिव्या काकरण आणि पूजा धांडा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 

बजरंगनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. विनेश फोगटनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकालं आहे. तर राहुल आवारेनं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली आहे.

वीरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमारी आणि विक्रम कुमार यांच्यां नावांची शिफारस द्रोणाचार्य पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. भीम सिंह आणि जय प्रकाश यांच्या नावाची शिफारस ध्‍यानचंद पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

राजीव गांधी खेलरत्‍न पुरस्‍कार हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कार हा क्रीडा प्रशिक्षकांना देण्यात येणारा पुरस्कार आहे.