World Cup 2019 : भारत-ऑस्ट्रेलियाची मॅच पाहण्यासाठी विजय माल्ल्या स्टेडियममध्ये

विजय माल्ल्याची सामना पाहण्यासाठी ओव्हल स्टेडियममध्ये हजेरी

Updated: Jun 9, 2019, 05:04 PM IST
World Cup 2019 : भारत-ऑस्ट्रेलियाची मॅच पाहण्यासाठी विजय माल्ल्या स्टेडियममध्ये title=

ओव्हल : कोट्वधी रुपयांचा गैरव्यवहार करुन इंग्लंडला पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाहण्यासाठी ओव्हल स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. सामना सुरु झाल्यावर विजय मल्ल्या स्टेडियमनमध्ये जाण्यासाठी हजर झाला. तेव्हा मैदानाबाहेर उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरलं. अजूनही विजय मल्ल्या लंडनमध्ये मौजमजा करत असल्याचंच यावरुन दिसून येत आहे. दरम्यान भारत आणि ब्रिटन सरकारमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावरुन वाटाघाटी सुरु आहेत. 

दरम्यान, प्रसार माध्यमांन विचारले असता आपण मॅच पाहण्यासाठी आलो असल्याचे उत्तर देऊन माल्ल्याने तेथून स्टेडियममध्ये पळ काढला. भारतीय बॅकांचं ९ हजार कोटींचं कर्ज न फेडता माल्ला इंग्लंडला पळून गेला आहे.