दुबई : भारत आणि पाकिस्तानमधल्या महामुकाबल्यासा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचे 12 सामने झाले आहेत. यापैकी 6 मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर 5 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एक मॅच पावसामुळे झाली नाही. भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅच या कायम युद्धासारख्याच खेळल्या जातात. दोन्ही देशांच्या क्रिकेट रसिकांमध्ये या मॅचसाठी रोमांच असतो. भारत-पाकिस्तान मॅचमधल्या घटना कायमच आठवण म्हणून लक्षात राहतात. अशाच काही मॅचवर एक नजर टाकूयात.
शारजाहमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान मॅच या नेहमीच खास असतात. शारजाहमध्ये मोठ्या प्रमाणावर भारत आणि पाकिस्तानचे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी येतात. त्यामुळे दोन्ही टीमना या मैदानात स्वत:च्या घरीच खेळल्यासारखं वाटतं. 1996 साली झालेल्या पॅप्सी कपच्या मॅचमध्ये भारतानं पहिले बॅटिंग करत क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच 300 रन बनवले. सचिन तेंडुलकर आणि नवजोत सिंग सिद्धूनं शतक लगावलं. पाकिस्तानचा या मॅचमध्ये 28 रननी पराभव झाला होता.
विशाखापट्टणममध्ये झालेली ही मॅच धोनीच्या वादळी शतकामुळे लक्षात राहिल. या मॅचमध्ये धोनीनं 123 बॉलमध्ये 148 रन केले होते. त्यावेळी भारतीय टीममध्ये सचिन, राहुल द्रविड, गांगुली यासारखे दिग्गज खेळाडू होते. पण धोनीच्या बॅटिंगसमोर सगळे फिके पडले. या मॅचमध्ये भारतानं पहिले बॅटिंग करून 9 विकेट गमावून 359 रन केले होते. पाकिस्तान या मॅचमध्ये 44.1 ओव्हरमध्ये 298 रनवर ऑल आऊट झाली.
या मॅचमध्येही 300 पेक्षा जास्त रन झाले. पाकिस्ताननं पहिले बॅटिंग करत भारताला 329 रनचं लक्ष्य दिलं. या मॅचमध्ये विराटनं 148 रनची खेळी करून भारताला दोन ओव्हरआधीच विजय मिळवून दिला.
इमरान खानच्या बॉलिंगसाठी ही मॅच कायम लक्षात राहिल. इमरान खानच्या बॉलिंगमुळे भारताची टीम 125 रनवर ऑल आऊट झाली. पण भारतानंही जोरदार कमबॅक करत पाकिस्तानला 87 रनवर ऑल आऊट केलं.
आशिया कपच्या फायनलमध्ये सुनिल गावसकर यांच्या 92 रनच्या खेळीमुळे भारतानं पाकिस्तानला 245 रनचं आव्हान दिलं. जावेद मियांदादनं चेतन शर्मांना शेवटच्या बॉलवर सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.