VIDEO: ही बॉलिंग ऍक्शन पाहून सगळेच हैराण

प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटमध्येही दररोज नवे प्रयोग होत आहेत.

Updated: Nov 9, 2018, 04:39 PM IST
VIDEO: ही बॉलिंग ऍक्शन पाहून सगळेच हैराण title=

मुंबई : प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटमध्येही दररोज नवे प्रयोग होत आहेत. अनेक वेळा खेळाडू मैदानात असे प्रयोग करतात जे पाहून सगळेच अवाक होतात. पण हे नवे प्रयोग नियमांना धरून असले पाहिजेत. हे नवेपण आजकाल क्रिकेटमध्ये फॅशन बनत चाललं आहे. बॅट्समन रिव्हर्स स्वीप, हेलिकॉप्टर शॉट आणि स्विच हिटसारखे प्रयोग करतायत. पण कठोर निर्बंध असल्यामुळे बॉलरना मात्र असे प्रयोग करता येत नाहीत.

बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवरून ३६० डिग्री फिरून बॉलिंग करणाऱ्या एका डावखुऱ्या स्पिनरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलरच्या या विचित्र बॉलिंग ऍक्शनमुळे अंपायरनंही हा डेड बॉल दिला. या बॉलरची स्विच अॅक्शन असली तरी त्यानं त्याचे खांदे स्विच केले नाहीत. असं असलं तरी अंपायरनं दिलेल्या डेड बॉलवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

अशी विचित्र बॉलिंग ऍक्शन बघितली की दक्षिण आफ्रिकेच्या पॉल ऍडम्सची आठवण होते. 

२०१६ साली आयपीएलमध्ये गुजरातकडून शिविल कौशिक खेळला होता. तेव्हा त्याच्या बॉलिंग ऍक्शनची चर्चा झाली होती. 

भारतीय टीमचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची बॉलिंग ऍक्शनही वेगळी आहे. 

बुमराहच्या बॉलिंग ऍक्शनवर सुरुवातीला बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण आज तो जगातला नंबर १ चा बॉलर आहे.