मुंबई : भारताने सेंट जॉर्ज मैदानावर उत्तम खेळ दाखवून साऱ्यांनाच खूष केलं.
दक्षिण आफ्रिकेला 73 धावांनी हरवून वेगळाच इतिहास रचला. भारताच्या या विजयाचा हिरो बनले फलंदाज रोहित शर्मा आणि चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव. कुलदीपने चार विकेट घेऊन ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हिटमॅन रोहित शर्मा भरपूर दिवसांनी दक्षिण आफ्रिकेत आपल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला.
पोर्ट एलिजाबेथमध्ये त्याने शानदार शतक केलं. रोहितने पाचव्या वन डेमध्ये 126 चेंडूत शानदार 115 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 11 चौके आणि 4 छक्के लावले. रोहित शर्मा आपल्या चांगल्या खेळामुळे स्लेजिंगचा शिकार देखील बनला. दक्षिण आफ्रिकेचा चायनामॅन गोलंदाज तबरेज शम्सी मैदानावर अनेकदा रोहित शर्माला उकसवताना दिसला. याचं उत्तर त्याने आपल्या बॅटच्या मार्फत दिलं.
Shamsi made the mistake of sledging Rohit Sharma. A fired up Sharma brought up his #NotSoFriendly century off Shamsi’s bowling. Brilliant is all we can say! #SAvsIND (India only) pic.twitter.com/5Y8oMhHhz1
— SonyLIV (@SonyLIV) February 13, 2018
शम्सी मैदानावर सतत विराट कोहलीशी बोलत होता. तेव्हा रोहित शर्माने उत्कृष्ठ खेळ दाखवत लाइम लाईटमझध्ये आला. एवढंच नाही तर स्लेजिंग करणाऱ्या शम्सीने टाकलेल्या चेंडूला अगदी जोरात उत्तर दिलं. रोहित शर्माने सिक्स मारण्याच्या बाबतीत अनेकदा रेकॉर्ड केले आहेत. इंटरनॅशन क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर ईअरमध्ये रोहित शर्माने 65 छक्के मारले. आणि असं करणारा हा पहिला क्रिकेटर आहे. यासोबतच सिझन 2017 - 18 मध्ये रोहित शर्माने सर्वात जास्त 57 छक्के लावले आहे.