नवी दिल्ली : अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजवर मात केली आहे. विकेटकीपर आणि बॅट्समन मोहम्मद शहजादने खेळलेल्या तुफानी इनिंगच्या जोरावर अफगाणिस्तानने वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजचा सात विकेट्सने पराभव केला आहे. वेस्टइंडिजची संपूर्ण टीम २०४ रन्सवर ऑल आऊट झाली होती. हे आव्हान अफगाणिस्तानच्या टीमने ९.२ ओव्हर्समध्ये गाठलं.
अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिज या दोन्ही टीम्स पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपच्या पात्रता फेरी क्वालिफाय केलं आहे. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान याने शाई होपची विकेट घेत विकेट्सची शंभरी गाठली. त्याने ४४ ओव्हर्समध्येच १०० विकेट्स पूर्ण केले. यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या नावावर होता.
मॅचनंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी वेस्टइंडिजचा स्फोटक बॅट्समन ख्रिस गेलसोबत जबरदस्त डान्स केला. या मॅचमध्ये शहजाद हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याच्या अंदाजात खेळताना दिसला.
Never change @MShahzad077. Never change.pic.twitter.com/2wn3wkp6f6
— Barny Read (@BarnabyRead) March 25, 2018
८४ रन्सची तुफानी इनिंग खेळणाऱ्या शहजादने मॅचमध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळला. जेसन होल्डरच्या बॉलवर शहजादने हेलिकॉप्टर शॉट खेळला. मोहम्मद शहजादला अफगाणिस्तानचा महेंद्र सिंग धोनी म्हणून ओळखलं जातं.