VIDEO: शून्यवर पुन्हा बोल्ड झाल्यामुळे केएल राहुल ट्रोल

भारताचा ओपनर केएल राहुलचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे.

Updated: Dec 17, 2018, 05:00 PM IST
VIDEO: शून्यवर पुन्हा बोल्ड झाल्यामुळे केएल राहुल ट्रोल title=

पर्थ : भारताचा ओपनर केएल राहुलचा खराब फॉर्म अजूनही कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही राहुल अपयशी ठरला. राहुल या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये २ रन करून तर दुसऱ्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला. या दोन्ही इनिंगमध्ये राहुलला ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी बोल्ड केलं. पहिल्या इनिंगमध्ये जॉस हेजलवूड तर दुसऱ्या इनिंगमध्ये मिचेल स्टार्कनं राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. दुसऱ्या इनिंगमध्ये बॉल खेळायचा का सोडायचा या गोंधळामध्ये राहुल आऊट झाला. सुरुवातीला राहुलनं बॉल खेळण्याचा प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी बॅट काढून घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता आणि बॅटला लागून बॉल स्टम्पला लागला.

राहुल १३ इनिंगमध्ये ११ वेळा बोल्ड आणि एलबीडब्ल्यू

केएल राहुल हा विराटनंतरचा भारताचा सर्वोत्तम खेळाडू आहे. तो विराटप्रमाणेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळू शकतो, असं वक्तव्य ही सीरिज सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कनं केलं होतं. पण राहुलला हा विश्वास सार्थ ठरवता आला नाही. मागच्या १३ इनिंगमध्ये राहुल ११ वेळा बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू आऊट झाला आहे. त्यामुळे राहुलच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

'राहुलनं शेवटची मॅच खेळली'

दुसऱ्या इनिंगमध्ये शून्यवर आऊट झाल्यानंतर केएल राहुलवर सोशल नेटवर्किंगवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. राहुलनं त्याची शेवटची टेस्ट मॅच खेळली आहे, असं एका यूजरनं लिहीलं. तर राहुलला काही वर्षांसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये बंदी घालावी, असं दुसरी यूजर म्हणाला.

केएल राहुलला टीममध्ये घेणं एक अपराध आहे. तो फक्त स्वत:च अपयशी ठरत नाही, तर देशाचं नावही खराब करतो. जर भारताचा पराभव झाला तर त्याला रवी शास्त्री आणि विराट कोहलीही जबाबदार आहेत, असं एकजण म्हणाला. शेवटच्या टेस्टमध्ये शून्य रनवर आऊट होणारे २ खेळाडू, सर डॉन ब्रॅडमन आणि केएल राहुल, असा टोमणाही एका यूजरनं मारला आहे.

KL Rahul Twitter 32

२०१८मध्ये खराब रेकॉर्ड

केएल राहुलनं यावर्षी १२ टेस्ट मॅचच्या २२ इनिंगमध्ये एक शतक आणि १ अर्धशतकाच्या मदतीनं ४६८ रन केले आहेत. यावर्षी राहुलची सरासरी २२.२८ एवढी आहे. राहुलचं हे रेकॉर्ड त्याच्या आत्तापर्यंतच्या रेकॉर्डपेक्षा खराब आहे. २६ वर्षांचा केएल राहुल आत्तापर्यंत ३३ टेस्ट खेळला आहे. या मॅचमध्ये राहुलनं ५५ इनिंगमध्ये ३५.७७ च्या सरासरीनं १८९६ रन केले आहेत. यामध्ये ५ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.