VIDEO : पत्नीला पाहताच युवीने लगावला गगनचुंबी SIX

एप्रिलमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिरीजला सुरूवात झाली आहे. जवळपास 2 महिने सुरू असणाऱ्या या सिझनची पहिली मॅच 7 एप्रिलला होणार आहे. या दिवशी गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स चैन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना वानखेडेमध्ये होणार आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 5, 2018, 08:21 AM IST
VIDEO : पत्नीला पाहताच युवीने लगावला गगनचुंबी SIX  title=

मुंबई : एप्रिलमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिरीजला सुरूवात झाली आहे. जवळपास 2 महिने सुरू असणाऱ्या या सिझनची पहिली मॅच 7 एप्रिलला होणार आहे. या दिवशी गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स चैन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना वानखेडेमध्ये होणार आहे. 

IPL साठी युवराजची जोरदार तयारी

आयपीएलचा भाग असलेल्या सर्व टीम मैदानावर घाम गाळत प्रॅक्टिस करत आहेत. याचसाठी किंग्स इलेवन पंजाब संघाचे खेळाडू देखील मोहाली मैदानावर प्रॅक्टिस करत आहेत. प्रॅक्टिस दरम्यान किंग्स इलेवन पंजाबमध्ये वापसी करणारा युवराज सिंह देखील उपस्थित होतात. यावेळी त्याची पत्नी हेजल कीज स्टेडिअममध्ये पोहोचली. हेजल मैदानावर पोहोचताच युवरात सिंहने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. 

 

Hahaha this happened right when i walked into the stadium!! Awesome! Thanks for sharing this video #Repost @yuvrajsingh_club with @get_repost ・・・ #Repost @yuvraj_singh_die_hard_fans • • • Vintage six from @yuvisofficial in yesterday’s practice match #YuvrajSingh #yuvi #IPL11 #LivePunjabiPlayPunjabi #kxip @hazelkeechofficial @_yuvian_forever_12 @aneesh.gautam69 @y_k_p_1_2 #yuvrajsingh #yuvi

A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial) on

काय केलं युवराजने? 

युवराजने प्रॅक्टिस दरम्यान हेजलला पाहताच शानदार षटकार मारला. आणि युवराजच्या या दमदार षटकाराचा व्हिडिओ स्वतः हेजलने शूट करून आपल्या सोशल मीडिया अकाऊंडवर शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ अगदी काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.  

युवराज - हेजलमध्ये तणाव? 

काही दिवसांपासून युवराज सिंह आणि हेजल कीजमध्ये तणावाचे वातावरण असल्याची चर्चा मीडियामध्ये होती. मात्र हेजलच्या या व्हिडिओने त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे सगळ्या अफवा शांत झाल्या आहेत. हेजल आणि युवराजचं 30 नोव्हेंबर 2016 रोजी लग्न झालं. 

युवराजचं लग्न हे फतेहगड साहिब गुरुद्वारातल्या बाबा राम सिंग डेरात व्हावं ही त्याच्या आई शबनमसिंग यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसारच पारपंरिक शीख पद्धतीनं युवराज आणि हेजलचं लग्न लावण्यात आलं. हेजलनं लग्नविधींसाठी किरमिजी रंगातला लेहंगा परिधान केला होता. युवराजही त्याच रंगातल्या शेरवानीत रुबाबदार दिसत होता.