नवी दिल्ली : २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.
पी. गुरुराजा यांने ५६ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. २८ वर्षीय गुरुराजा यांने २४९ किलो वजन उचलत भारताच्या खात्यात पहिले पदक जमा केले आहे.
मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांने २६१ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले तर श्रीलंकेच्या अशून चतुरंगा लकमल यांने २४८ किलो वजन उचलत कांस्य पदकाची कमाई केली.
#Gururaja clinches silver for India in men's weightlifting 56 kg category. #CWG18 pic.twitter.com/PuMiBFkl8B
— ANI (@ANI) April 5, 2018