Major League Cricket : नुकतीच आयपीएल ( IPL 2023 ) संपली. तर आयपीएलनंतर आता मेजर लीग क्रिकेटच्या ( Major League Cricket ) तयारीला सुरुवात होताना दिसतोय. अमेरिकेसारख्या देशात क्रिकेट हा खेळ लोकप्रिय होण्यासाठी ही लीग सुरु करण्यात येतेय. आता ऑक्शनंतर टीम्सने काही तज्ज्ञ लोकांचा सामवेश करण्यास सुरुवात केलीये. अशातच सर्वात लोकप्रिय टीम मुंबई इंडियन्समध्ये एका मोठ्या आणि दिग्गज खेळाडूची एन्ट्री आहे.
आयपीएलमधील मोठी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सने त्यांच्या मेजर लीग क्रिकेट फ्रँचायझी MI न्यूयॉर्कच्या (MI New York ) गोलंदाजी कोचची घोषणा केली आहे. या टीमने न्यूयॉर्कच्या गोलंदाजी कोच पदाची जबाबदारी आपल्याच एका दिग्गज खेळाडूवर सोपवलीये. मुख्य म्हणजे आयपीएलमध्ये हा खेळाडू दुसऱ्या टीमचा कोच होता.
मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगा यांची गोलंदाजीच्या कोचपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसिथ मलिंगा एमआय कॅम्पमध्ये परतला आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये लसिथ मलिंगाने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजी विभागाच्या कोच पदाची धुरा स्विकारली होती. त्यामुळे इंडियन प्रिमीयर लीगमध्ये राजस्थानच्या टीमचा कोच असलेला खेळाडू आता एमआयच्या कोचपदाची जबाबदारी घेणार आहे.
Lasith Malinga appointed as the bowling coach of MI New York in the MLC T20.
He is back with the MI family. pic.twitter.com/y3P7OLujo3
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2023
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम फार यशस्वी मानली जाते. टीमच्या या यशामध्ये लसिथ मलिंगाचं मोठं योगदान आहे. मलिंगाने एम आयकडून खेळताना 2009 ते 2019 दरम्यान 122 सामन्यात 170 विकेट घेतल्यात. यावेळी 13 रन्समध्ये 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मेजर लीग क्रिकेटचा ( Major League Cricket ) पहिला सिझन 13 पासून सुरु होणार आहे. तर या लीगची फायनल 30 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये एकूण 6 टीम्स असून ज्यामध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलच्या तीन टीम्सचा समावेश आहे. MI ची MI न्यूयॉर्क, KKR ची लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि CSK ची टेक्सास सुपर किंग्स या टीम्स मेजर क्रिकेट लीगमध्ये उतरणार आहेत.