IPL मध्ये फ्लॉप शो! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात?

पांड्या किंवा ऋतुराज नाही तर टीम इंडियातील या खेळाडूचं करिअर धोक्यात पाहा कोण तो खेळाडू?

Updated: May 16, 2022, 10:22 AM IST
IPL मध्ये फ्लॉप शो! टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात?  title=

मुंबई : आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी खूप उत्तम कामगिरी केली आहे. तर कोट्यवधी रुपये फी घेऊनही काही खेळाडू सुपरफ्लॉप ठरले आहेत. त्यापैकीच एका खेळाडूचं करिअर धोक्यात आल्याची चर्चा आहे. 

कोलकाताचा स्टार खेळाडू मात्र हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सुपरफ्लॉप ठरला. त्याचा फ्लॉप फॉर्म पाहून आता त्याचं करिअर धोक्यात येऊ शकतं. कारण त्याला टीम इंडियासाठी मोठी स्पर्धा आहे. 

टी 20 वर्ल्ड कपचे सामने जवळ येत असताना आता त्याचं असं फ्लॉप ठरणं धोक्याचं आहे. तो खेळाडू पांड्या किंवा ऋतुराज नाही तर व्यंकटेश अय्यर असल्याची माहिती मिळाली आहे. 

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अय्यरने केवळ 6 बॉलमध्ये 7 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरला कोलकाताने 8 कोटी रुपये देऊन टीममध्ये समाविष्ट केलं. गेल्या हंगामात अय्यरने टीमला प्लेऑफपर्यंत पोहोचवलं होतं. 

आयपीएल 2022 मध्ये तो टीमला चांगली सुरुवातही करून देऊ शकला नाही. व्यंकटेश अय्यरने या मोसमात खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 18.20 च्या सरासरीने केवळ 182 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याला केवळ एक अर्धशतक करता आलं.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अनेक नवखे खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. अशावेळी व्यंकटेश अय्यरसाठी धोक्याचा इशारा असू शकतो. रोहित शर्मा टीमची बांधणी करत आहे. यंदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे व्यंकटेश अय्यरला आता संधी मिळणार की नाही हे पाहावं लागणार आहे.