Video : विकेट न मिळाल्याने संतापला KKR चा गोलंदाज, रागाच्या भरात केलं असं की...

सामन्यात केकेआरचे गोलंदाज विकेट घेण्याचा खूप प्रयत्न करत होते. 

Updated: May 19, 2022, 07:47 AM IST
Video : विकेट न मिळाल्याने संतापला KKR चा गोलंदाज, रागाच्या भरात केलं असं की... title=

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी त्यांच्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली. कालच्या सामन्यात लखनऊच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत 211 रन्सचं आव्हान दिलं. मात्र या सामन्यात केकेआरचे गोलंदाज विकेट घेण्याचा खूप प्रयत्न करत होते. दरम्यान विकेट न मिळाल्यावर केकेआरच्या एका गोलंदाजाने असा चेंडू टाकला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

स्पिनरने फेकला बाऊंसर

क्रिकेटमध्ये स्पिनर गोलंदाजाने बाऊन्सर टाकणं फार क्वचितच घडताना दिसतं. असंच काहीसे या सामन्यात घडलं. वरुण चक्रवर्ती 8 ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने नो-बॉल टाकला. क्विंटन डी कॉक फ्री-हिट चेंडू खेळण्यासाठी स्ट्राइकवर होता. 

अशातच वरूण थोडा रागात दिसून आला. यावेळी त्याने 109 KMPH वेगाने टाकला, जो डिकॉकला खेळणं अशक्य होतं. या बाऊन्सरनंतर प्रेक्षकंही पाहत बसले. 

या सामन्यात क्विंटन डी कॉकने 70 बॉलमध्ये नाबाद 140 रन्स केले. यामध्ये 10 चौकार आणि 10 सिक्सचा समावेश आहे. या सामन्यात क्विंटन डी कॉकने केएल राहुलच्या 20 ओव्हरमध्ये 210 रन्सची पार्टनरशीप केली. 

या सामन्यात केकेआरच्या एकाही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. वरुण चक्रवर्तीने या सामन्यात 4 ओव्हर टाकले. त्याने 9.50 च्या इकॉनॉमीने 38 रन्स खर्च केले.