T20 World Cup साठी Urvashi Rautela ऑस्ट्रेलियात! नेटकरी म्हणाले, "ऋषभ पंतचे तर..."

भारतीय स्क्वॉडमधील ऋषभ पंत (Rishabh Pant) वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एका पोस्टद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला आहे.

Updated: Oct 9, 2022, 01:57 PM IST
T20 World Cup साठी Urvashi Rautela ऑस्ट्रेलियात! नेटकरी म्हणाले, "ऋषभ पंतचे तर..." title=

Urvashi Rautela In Australia T20 World Cup:  टी 20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. या स्पर्धेसाठी 16 संघ सहभागी झाले आहेत. भारतीय संघ या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ 15 वर्षानंतर टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. पर्थला पोहोचलेल्या भारतीय खेळाडूंनी रविवारी जोरदार सरावही केला, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) शेअर केला आहे. असं असताना भारतीय स्क्वॉडमधील ऋषभ पंत (Rishabh Pant) वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एका पोस्टद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला आहे. या पोस्टचा संबंध नेटकरी ऋषभ पंतशी जोडत आहेत.

हार्ट इमोजी पोस्ट करत उर्वशीने लिहिले आहे की, 'तुझ्या मनाचा वेध घेत मला ऑस्ट्रेलियाला आले.' हॅशटॅगमध्ये तिने आपले नाव लव्ह या इमोजीसह लिहिले आहे. अशा परिस्थितीत उर्वशी पंतला ऑस्ट्रेलियात भेटणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. उर्वशीने मात्र याबाबत काहीही लिहिलेले नाही. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'दीदी पंत भाऊंचा पाठलाग काही सोडत नाही.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'आपल्याकडे काही आठवड्यांचा अवधी आहे, लगेच वर्ल्डकपचं आयोजन दुसरीकडे करा'

ऋषभ पंतच्या वाढदिवशी उर्वशीने सोशल मीडियावर फ्लाइंग किस व्हिडीओ शेअर केला होता. कॅप्‍शनमध्‍ये 'हॅप्पी बर्थडे' असेही लिहिले होते. तिने पंतचा उल्लेख केला नसला तरी चाहत्यांनी पंतलाच शुभेच्छा दिल्याचा अंदाज वर्तवला. यापूर्वी उर्वशीने पंतला टार्गेट करून 'मिस्टर आरपी' आणि 'छोटू भैया' म्हटले होते.