मुंबई : अमेरिकेत मायनर क्रिकेट लीग (Minor Cricket League) खेळत असलेल्या उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने आपल्या तळपत्या बॅटने गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला आहे. शिकागो ब्लास्टर्स विरुद्ध खेळताना त्यांने सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सला 9 विकेट्सने विजय मिळवून दिला. उन्मुक्त चंद यांने 63 चेंडूत नाबाद 90 धावांची खेळी केली.
उन्मुक्त चंद (Unmukt Chand) हा भारतीय खेळाडू आहे. त्याला दिल्लीचा संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही देत नव्हता, तो फलंदाज जो रणजी ट्रॉफीचा एक सामना खेळण्याची धडपड करत होता. त्याला संधी न मिळाल्याने त्याने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. आता त्याच फलंदाजाने भारताबाहेर त्याच्या बॅटने जलवा दाखवून दिला आहे. उन्मुक्त चंद याच्याबद्दल बोलले जात आहे, तो सध्या अमेरिकेच्या मायनर क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. उन्मुक्त सध्या अव्वल फॉर्ममध्ये आहे आणि त्याने त्याच्या संघाला शिकागो ब्लास्टर्सविरुद्ध 9 विकेटच्या नेत्रदीपक विजय मिळवून दिला आहे.
उन्मुक्त चंद याने फलंदाजी करताना 63 चेंडूत नाबाद 90 धावा केल्या. उन्मुक्त चंदने त्याच्या डावात 10 चौकार आणि 3 षटकार मारले. उन्मुक्त चंदचा स्ट्राइक रेट 142 पेक्षा जास्त होता. उन्मुक्त चंदसोबत वेस्ट इंडिजचा फलंदाज नरसिंग देवनारायणनेही शानदार फलंदाजी केली. या डावखुऱ्या फलंदाजाने 30 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. त्याचबरोबर श्रीलंकेच्या शेहान जयसूर्यानेही 20 धावांची इनिंग खेळली.
उन्मुक्त चंद याने मायनर क्रिकेट लीग (Minor Cricket League) क्रिकेटमध्ये आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 60.80 च्या सरासरीने 304 धावा केल्या आहेत. उन्मुक्त चंदच्या बॅटमधून एकूण 10 षटकार आणि 30 चौकार आले आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 113 पेक्षा जास्त आहे. उन्मुक्त चंदने स्पर्धेत आतापर्यंत 3 अर्धशतके केली आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 90 आहे, जी त्याने फक्त शिकागो ब्लास्टर्सविरुद्ध केली होती.
उन्मुक्त चंद याने वयाच्या 28 व्या वर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली भारताने 2012 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकला. तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्सकडूनही खेळला.