MS Dhoni 2040 Look: CSK च्या सामन्यात दिसला 2040 मधील धोनी! 10 लाखांहून अधिक Likes मिळालेला Video पाहाच

MS Dhoni From 2040 Goes Viral: इंडियन प्रमिअर लिगच्या चेन्नई विरुद्ध पंजाबदरम्यानच्या 51 व्या सामन्यामधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्याला लाखोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 10, 2023, 12:01 PM IST
MS Dhoni 2040 Look: CSK च्या सामन्यात दिसला 2040 मधील धोनी! 10 लाखांहून अधिक Likes मिळालेला Video पाहाच title=
MS Dhoni 2040 Look

MS Dhoni 2040 Look: भारतीय संघाचा माजी कर्णदार महेंद्र सिंघ धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटला रामराम करुन अनेक वर्ष झाली आहेत. लवकरच धोनी इंडियन प्रमिअर लीगमधूनही निवृत्त होत क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही आयपीएल पर्वांपासून धोनीच्या रियायरमेंटची चर्चा सुरु आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 सालीच निवृत्ती जाहीर केली. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत असून आजही त्याचा खेळ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं चाहते मैदानात येतात. नेतृत्व आणि अंतिम षटकामधील फटकेबाजीमध्ये माहीर असलेला माही हा आजही चेन्नईच्या संघातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे यात शंका नाही.

तो व्हिडीओ चर्चेत

धोनीने घेतलेला डीआरएस असो किंवा त्याची फलंदाजी असो मैदानावरील आणि मैदानाबाहेरील त्याची प्रत्येक कृती चर्चेत असते. त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक धोनीसंदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये धोनी नसून त्याच्यासारखीच दिसणारी एक व्यक्त आहे. धोनीचं वय झाल्यानंतर तो कसा दिसू शकतो याचा अंदाज बांधून अगदी तसाच दिसणारा हा चाहता मैदानात सामना पाहण्यासाठी आलेला असताना त्याची झलक कॅमेरात टीपली गेली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील चेन्नई विरुद्ध पंजाबदरम्यान खेळवण्यात आलेल्या 41 व्या सामन्यामधील हा व्हिडीओ असून चेन्नास्वामी स्टेडियमवर तो शूट करण्यात आला आहे. 

कॅप्शनने वेधलं लक्ष

एका इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करताना, "धोनी 2040 मध्ये हा (आयपीएलचा) सामना पाहताना," अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक लाइक मिळाले आहेत. 4 हजारांहून अधिक कमेंट्स या व्हिडीओला मिळाल्या असून चाहते हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. 'टाइम ट्रॅव्हल शक्य आहे,' असं एकाने म्हटलं आहे. इतरही अनेक चाहत्यांनी खरोखरच टाइम ट्रॅव्हलसंदर्भातील कमेंट करताना आपल्याला असं चित्र 2040 मध्ये पहाला मिळू शकत असं म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @issa_vibe_dump

धोनी कधी निवृत्त होणार?

धोनीच्या निवृत्तीसंदर्भात त्याचा माजी सहकारी सुरेश रैनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठं विधान केलं होतं. धोनीने आपल्याला निवृत्तीसंदर्भात सांगितल्याचा दावा रैनाने केला. "मी अजून एक (आयपीएल) चषक जिंकल्यानंतर वर्षभर तरी खेळणार आहे, असं तो मला म्हणालाय," असं विधान रैनाने केलं आहे. आता धोनी कधी निवृत्त होतो हे येणारा काळ सांगेलच पण त्याच्या निवृत्तीआधीच त्याचा हा 2040 लूक व्हायरल झालाय हे मात्र निश्चित.