Rohit Sharma: टी 20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयरलँडशी होणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पुरेसा सरावही करताना दिसतेय. मात्र टीम इंडियाचा कर्णधार काही वेगळ्याच मूडमध्ये दिसून येतोय. रोहित शर्मा क्रिकेटचा सराव करण्याऐवजी सुईत धागा ओवणं तसंच झाडू मारणं याचं क्रिकेटशी संबंधी ट्रेनिंग घेताना दिसतोय. रोहितच्या या सरावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
सध्या सोशल मीडियावर सध्या एका जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये एका लहानग्या मुलाची आई टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंकडून क्रिकेटसंदर्भातील वेगळात सराव करताना दिसतेय. यामध्ये ही मम्मी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना सुईत धागा ओवण्याचं चॅलेंज देते. यामुळे फोकस वाढणार असून हँज-आय कॉर्डिनेशनही उत्तम होईल असं, ती महिला म्हणतेय.
सुईत धावा ओवण्याचं चॅलेंज रोहित शर्मा लगेच पूर्ण करतो आणि प्रचंड खूश होतो. यानंतर जाहिरातीतील मम्मी हिटमॅनच्या हाती झाडू देते आणि त्याला स्विप शॉटचा सराव करण्यास सांगते. वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंची आलेली ही जाहिरात चाहत्यांना फार आवडली असून रोहित शर्मा देखील यावेळी एका वेगळ्याच अंदाजात दिसतोय.
Focus se leke, sweep shot tak: Har jagah, Mummyji ka magic phel raha hai
.
.#Dream11 #YehSabkaDreamHai #Collab #Ad @Dream11 pic.twitter.com/TWX562JEMb— Rohit Sharma (@ImRo45) June 2, 2024
दरम्यान वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्टार स्पोर्ट्सचा हा व्हिडीओ असून रोहित शर्मा म्हणतोय, वर्ल्डकपचं प्रेशर नेहमीच असतं. कारण वर्ल्डकप हा वर्ल्डकप आहे. या काळात तुम्हाला तुमचा बेस्ट परफॉर्मन्स देणं भाग आहे. या स्पर्धेमध्ये जितके खेळाडू, तितके देश खेळतात ते सर्व त्यांच्या परफॉर्मन्स एक स्तर वर देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमच्यासाठी एक खेळाडू म्हणून हे खूप मोठं आव्हान असतं. कारण तुम्हाला माहिती असतं, या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही गोष्टी सोप्या मिळणार नाहीयेत.
आमच्याकडे अनुभव आहे, आमच्याकडे अग्रेशन आहे, तरूण खेळाडूही आहे. याचाच अर्थ आमच्याकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही आहे. त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला खेळाचा आनंद घ्यायचा आहे. 2007 चा पहिला टी-20 वर्ल्डकप आम्ही जिंकलो. त्यानंतर आम्ही चांगली कामगिरी केली, मात्र जिंकू शकलो नाही. त्यामुळे यंदाच्या वेळी आमच्याकडे एक चांगली संधी आहे चॅम्पियन होण्याची, असंही हिटमॅनने म्हटलं आहे.