दुबई : जिमी नीशम न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. जिमी नीशमने इंग्लंडविरुद्ध असलेलं अपूर्ण काम कालच्या सामन्यात पूर्ण केलं. जे काम 2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2021 च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. केन विल्यमसनच्या टीमने इंग्लंडवर पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयात जिमी नीशमची भूमिका महत्त्वाची होती.
मात्र विजय मिळवल्यानंतरही जिमी नीशम फार काही खूश दिसला नाही. सामना संपल्यानंतर मॅचविनिंग इनिंग खेळणारा जिमी नीशम गप्प असलेला दिसला. नीशमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
न्यूझीलंडच्या टीमने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीशमच्या झंझावाती सामन्यातील टर्निंग इनिंगच्या जोरावर टीमने हा ऐतिहासिक क्षण गाठला. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे एकेकाळी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलेल्या नीशमने संघाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयानंतर तो मैदानाजवळ एकटाच बसलेला दिसला. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले पण नीशम मैदानाजवळ एकटाच राहिला.
त्याचसोबत नीशमचे हा फोटो इतके व्हायरल झाले की, त्यालाच त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या ट्विटला उत्तर देताना नीशमने, 'मला वाटत नाही की अजून काम संपलं आहे.'
Job finished? I don’t think so. https://t.co/uBCLLUuf6B
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 10, 2021
17व्या षटकात एकूण 23 धावा झाल्या. त्यामध्ये दोन वाइड तर दोन न्यूझीलंडला लेग बायच्या रूपात मिळाल्या. नीशमने पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर सिक्स ठोकला तर तिसऱ्या चेंडूवर फोर मारली. यानंतर पुढच्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने सिक्स मारला. 11 चेंडूत 27 धावांची खेळी खेळणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूने सामना इंग्लंडच्या न्यूझीलंडकडे वळवला.