टेनिसपटू सेरेना विल्यम्सने दिली गोड बातमी

सेरेनाने एका मुलीला जन्म दिला आहे त्यामुळे तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 2, 2017, 11:33 AM IST
टेनिसपटू सेरेना विल्यम्सने दिली गोड बातमी title=

न्यूयॉर्क: २३ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेना आणि टेनिसच्या इतिहासात अत्यंत तरबेज खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने सर्वांना गोड बातमी दिली आहे. तिच्या घरी एका नन्ह्या परीचं आगमन झाल आहे. सेरेनाने एका मुलीला जन्म दिला आहे त्यामुळे तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. 
जानेवारी २०१७ मध्ये प्रेग्नंट असतानाही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा जगभरातील तिच्या चाहत्यांसाठी ती चर्चेचा विषय बनली होती. पण त्या काळातही सेरेनाने ग्रँड स्लॅम जिंकून आपल्या चाहत्यांसह अवघ्या टेनिस जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार 

मुलीली जन्म दिल्यानंतर सेरेना आपल्या खेळातून काही काळ ब्रेक घेईल अशी चर्चा सगळीकडे होती. पण या चर्चांना तिने पूर्णविराम दिला आहे. आता पुढील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती खेळणार असल्याचं सेरेनानं म्हटलं आहे.