माजी कर्णधार एमएस धोनीला निवड समितीकडून ‘अल्टीमेटम’

  बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की, ‘माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या भविष्यावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

Updated: Aug 15, 2017, 03:19 PM IST
माजी कर्णधार एमएस धोनीला निवड समितीकडून ‘अल्टीमेटम’ title=

पल्लेकेले :  बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की, ‘माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या भविष्यावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

मात्र धोनीचा खेळ सुधारला नाही किंवा त्याने चांगलं परफॉर्मन्स दिलं नाही तरच त्याला पर्यायी खेळाडू शोधला जाईल. त्यामुळे धोनीचं टीम इंडियातील स्थान धोक्यात आहे की काय, असा प्रश्न पडला आहे. 

युवराज सिंहला विश्रांती देण्याच्या स्थितीवर स्पष्टीकरण दिल्यानंतर प्रसाद यांना धोनीबाबत विचारले गेले. ते म्हणाले की, ‘मी इमानदारीने सांगतो. चर्चा तर प्रत्येकाच्या बाबतीत होतात. असे नाहीये की, केवळ महेंद्र सिंह धोनीच्या बाबतीतच चर्चा झाली. तेव्हा असे ठरले की, धोनीचा परफॉर्मन्स सुधारला नाहीतर त्याला पर्याय शोधला जाईल’.

युवराजबाबत ते म्हणाले की, ‘युवराजला विश्रांती देण्यात आली आहे. कुणाचेही दरवाजे कधीही बंद होत नाहीत. टीमचे कॉम्बिनेशन पाहून टीम सिलेक्शन करताना सर्वच खेळाडूंबाबत बोलणं झालं. त्यानंतर सिलेक्शन केलं गेलं. 

धोनीबाबत ते म्हणाले की, ‘जोपर्यंत तो टीममध्ये चांगला खेळत आहे. तोपर्यंत त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची समस्या नसणार. आम्हाला सर्वांना वाटतं की टीम इंडियाने चांगलं परफॉर्म करावं.