भारतीय संघाला मिळाला नवा विराट कोहली, शतके ठोकून वेधून घेतोय सर्वांचं लक्ष

रणजी ट्रॉफीमध्ये चांगल्या कामगिरीमुळे सध्या एक युवा खेळाडू चर्चेत आहे. अशीच कामगिरी करत राहिला तर भारतीय संघात लवकरच त्याला संधी मिळू शकते.

Updated: Mar 7, 2022, 09:38 AM IST
भारतीय संघाला मिळाला नवा विराट कोहली, शतके ठोकून वेधून घेतोय सर्वांचं लक्ष title=

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करतोय. संघात नव्या खेळाडूंना संधी दिली जातेय. ज्यामुळे भविष्यात मजबूत संघ बनवता येईल. बीसीसीआय आणि कोच राहुल द्रविड आगामी वर्ल्डकपसाठी टीममध्ये कोणाला संधी द्यावी. याची चाचपणी करत आहेत. त्यामुळे नव्या खेळाडूंना अधिक संधी दिली जातेय.

नव्या खेळाडूंचा शोध घेण्याची गरज असते तेव्हा रणजी ट्रॉफीवर नजर जाते. जेथे संघाला नवे खेळाडू मिळतात. सध्या रणजी ट्रॉफीमध्ये 19 वर्षाचा खेळाडू चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे त्याची चर्चा आहे. 

भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार यश ढुल रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करतोय. एका महिन्यात त्याने आपल्या कामगिरीने सगळ्यानाच प्रभावित केलंय. 19 वर्षाचा हा खेळाडू तिसऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यात दुहेरी शतक ठोकून सगळ्यांच्या नजरेत आला. रणजी ट्रॉफी 2022 सीजनमध्ये दिल्लीकडून खेळताना यश ढुलने शानदार खेळ दाखवला.

3 सामन्यात 2 शतक एक दुहेरी शतक

छत्तीसगड संघाच्या विरुद्ध यश ढुलने पहिल्या इनिंगमध्ये 29 रन केले होते. पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने फक्त 261 बॉलमध्ये नाबाद 200 धावांची खेळी केली. त्याने या इनिंगमध्ये 26 फोर लगावले. रणजी ट्रॉफीमध्ये यश ढुलने आतापर्यंत 119.75 च्या रनरेटने 479 रन केलेत. सर्वा जास्त रन करणाऱ्यांच्या यादीत आला आहे. याआधी त्याने आपल्या डेब्यू सामन्यात दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकले होते. त्याने 113 आणि नाबाद 113 रनची खेळी केली होती.

IPL 2022 मधील कामगिरीकडे लक्ष

भारताला पाचव्यांना अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार यश ढुल आता आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 50 लाखांना खरेदी केलं आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी चूरस नाही दिसली. दिल्ली आणि पंजाबने त्याच्यावर बोली लावली होती.