Virat Kohli ने ही फॉलो केला 'पुष्पा' ट्रेंड, पाहा विराटने कोणासाठी केली 'मैं झुकेगा नहीं' ची स्टेप

मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयात रविंद्र जडेजाची महत्त्वाची भूमिका होती. दरम्यान विराटही त्याला फॉलो करताना दिसला.

Updated: Mar 6, 2022, 11:24 PM IST
Virat Kohli ने ही फॉलो केला 'पुष्पा' ट्रेंड, पाहा विराटने कोणासाठी केली 'मैं झुकेगा नहीं' ची स्टेप  title=

मोहाली : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील पुष्पा (Pushpa) सिनेमाच्या ट्रेंडमध्ये सहभागी झाला आहे. मोहाली टेस्ट (Mohali Test) च्या तिसऱ्य़ा दिवशी 'पुष्पा' सिनेमातील फेमस डायलॉग 'मैं झुकेगा नहीं' ची कॉपी करताना तो दिसला. त्याने ही गोष्ट रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) साठी केली.

रविंद्र जडेजा गेल्य़ा काही दिवसांपासून ही स्टाईल कॉपी करताना दिसत आहे. त्याने त्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. या व्हि़डिओमध्ये जडेजाचा लुक अल्लू अर्जुन सारखाच दिसत होता. मोहाली टेस्टमध्ये रविंद्र जडेजाने बॅटींग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली. त्यानंतर विराटने त्याच्यासाठी ही स्टेप केली.

मोहाली टेस्टच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कोहलीने पुष्पाची ही स्टाईल केली. 51व्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने लसिथ एंबुलदेनियाची विकेट घेतली. जडेजाची ही या टेस्टमधली नववी विकेट होती. मैदानात कोहलीने 'पुष्पा' सिनेमातील 'मैं झुकेगा नहीं' ची स्टेप करत जडेजाची मज्जा घेतली.

मोहाली टेस्टमध्ये जडेजाने शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवशी तो 45 रनवर नॉटआऊट राहिला. त्यानंतर त्याने 175 रन्सची शानदार खेळी केली. सातव्या क्रमांकावर खेळत असताना त्याची ही सातवी सर्वात मोठी खेळी होती. त्याने त्याच दिवशी एक विकेट देखील घेतली. तिसऱ्या दिवशी त्याने 8 गोलंदाजांना माघारी पाठवले. या कामगिरीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ दी मैच' चा पुरस्कार मिळाला.