पारंपारिक बिहू नृत्य, केकही कापला..., गुवाहाटीतील जंगी स्वागत पाहून Team India भारावली

पारंपारिक नृत्यासह टीम इंडियाचं गुवाहाटीत जंगी स्वागत पाहिलं का?

Updated: Sep 30, 2022, 05:27 PM IST
पारंपारिक बिहू नृत्य, केकही कापला..., गुवाहाटीतील जंगी स्वागत पाहून Team India भारावली title=

IND vs SA 2nd T20: आगामी T20 World Cup साठी भारतीय संघ सज्ज झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिरीज (IND vs AUS) जिंकल्यानंतर आता भारताने साऊथ आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने (IND vs SA) कंबर कसली आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने आफ्रिकेचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी गुवाहाटीला पोहोचली आहे. (Team India was overwhelmed by the traditional Bihu dance cake cutting and the warm welcome in Guwahati)

टीम इंडिया (Team India) गुवाहाटीत पोहोचल्यानंतर संघाचं जोरदार स्वागत केलं गेलं. टीम इंडिया विमानतळावर पोहोचल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी एकच गर्दी केली होती. आपल्या आवडत्या खेळाडूच्या एका फोटोसाठी मोठी गर्दी जमली. तर सर्वांचे कॅमेरे खेळाडूंवर रोखले गेले. पारंपारिक पद्धतीची शाल देऊन खेळाडूंचं स्वागत केलं गेलं.

हॉटेलमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियासाठी खास केक तयार करून ठेवण्यात आला होता. पहिल्या सामन्यात विजयाचे शिल्पकार राहिलेल्या दीपक चहर (Deepak Chahar) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) यांनी केक कापला. तर हॉटेलमध्ये गुवाहाटीचं पारंपारिक नृत्य असलेला बिहू नृत्य देखील सादर करण्यात आलं.

Rishabh Pant सोबत असं का घडतंय? Virat Kohli ने तोंडावर केलं इग्नोर, व्हिडीओ व्हायरल!

दरम्यान, गुवाहाटीतील जंगी स्वागत पाहून Team India भारावली आहे. 2 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया गुवाहाटीमध्ये दुसरा IND vs SA 2nd T20 सामना खेळणार आहे. त्यासाठी आता दोन दिवस संघ सराव देखील करेल. गुवाहाटीच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार असल्याने गोलंदाज कसून सराव करताना दिसतील.