Rishabh Pant सोबत असं का घडतंय? Virat Kohli ने तोंडावर केलं इग्नोर, व्हिडीओ व्हायरल!

या व्हिडिओमध्ये विराट त्याचा सहकारी खेळाडू ऋषभ पंतकडे दुर्लक्ष करताना दिसतोय.

Updated: Sep 30, 2022, 02:24 PM IST
Rishabh Pant सोबत असं का घडतंय? Virat Kohli ने तोंडावर केलं इग्नोर, व्हिडीओ व्हायरल! title=

मुंबई : विराट कोहली हा भारतीय टीमचा स्टार फलंदाज आहे. यंदाचा T20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे, त्याआधी कोहलीने गमावलेला फॉर्म परत मिळवला आहे. विराटचा फॉर्म टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे चाहतेही खूप खूश आहेत. पण विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतेय. जो त्याच्या आणि टीम इंडियाच्या चाहत्यांना अजिबात आवडणार नाही. या व्हिडिओमध्ये विराट त्याचा सहकारी खेळाडू ऋषभ पंतकडे दुर्लक्ष करताना दिसतोय.

विराटने पंतशी हात नाही मिळवला

आशिया कपदरम्यान ही घटना घडलीये. विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावलंय. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. सामना जिंकल्यानंतर विराट सर्वांशी हस्तांदोलन करत होता. पंत केएल राहुलच्या मागे उभा होता, विराटने राहुलशी हस्तांदोलन केलं, पण जेव्हा पंतने त्याला जोडण्यासाठी हात पुढे केला तेव्हा विराटने पंतकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि हात न मिळवता दुसऱ्या बाजूला गेला.

ऋषभ टीमपासून अलिप्त दिसला

गेल्या काही सामन्यांमध्ये तो टीमपासून अलिप्त दिसू लागलाय. यापूर्वीही सामना संपल्यानंतरच्या सेरेमनीदरम्यान खेळाडू हसत-खेळत असताना पंत केवळ त्यांच्याकडे पाहत उभा असल्याचं दिसलं. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतही हेच पाहायला मिळालं. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भारतीय खेळाडू एका ग्रुपमध्ये गप्पा मारताना दिसले होते, पण त्यादरम्यान पंत टीममधून पूर्णपणे अलिप्त चेहऱ्याने कॅमेऱ्यात कैद झाला होता.

दिनेश कार्तिक की ऋषभ पंत?

टीम इंडियात कोणाची निवड करायची, दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? हा प्रश्न सध्या फार चर्चेत आहे. पंत फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे दिनेश कार्तिकला त्याच्या आधी टीममध्ये स्थान मिळावं, असं अनेक दिग्गजांचे मत आहे. त्याच वेळी, काही दिग्गज आहेत जे ऋषभ पंतला एक चांगला पर्याय म्हणून पाहतात. पण या सगळ्यात कर्णधार रोहित शर्माने या दोन्ही खेळाडूंना सोबत घेऊन खेळायचं असल्याचं स्पष्ट केलंय.