Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपदाचा वाद, रोहितसोबतच्या मतभेदावर काय म्हणाला विराट?

एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Updated: Dec 15, 2021, 05:07 PM IST
Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपदाचा वाद, रोहितसोबतच्या मतभेदावर काय म्हणाला विराट? title=

मुंबई : एकदिवसीय कर्णधारपदाच्या (Captaincy) वादानंतर अखेर विराट कोहलीने (Virat Kohli) समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) काही खटकलंय  का, निवड समितीचा निर्णय, या आणि अशा बऱ्याच मुद्द्यावरुन विराटने आपली बाजू मांडली. विराटने पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवरुन स्पष्टीकरण दिलंय. तो नेमकं काय म्हणालाय हे आपण 10 मुद्द्यातून जाणून घेणार आहोत. (Team india virat kohli reaction over to odi captaincy issue in press confrence before south africa tour)

विराट काय म्हणाला?  

-  निवड समितीच्या बैठकीच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क करण्यात आला.

- निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी आधी टेस्ट टीमबाबत चर्चा केली. 

- कॉल संपण्याआधी एकदिवसीय कर्णधार नसल्याचं सांगण्यात आलं. 

-मला एकदिवसीय कर्णधारपदावून काढण्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. 

-कर्णधार पदावरून हटवण्यावरुन मला आक्षेप किंवा हरकत नाही.

-मी आता कर्णधार नाही, असं निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. 

- आफ्रिका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांतीबाबत मी बीसीसीआयसह संवाद साधला नाही. 

- एकदिवसीय मालिकेसाठी मी उपलब्ध आहे.  

- रोहित शर्माला कॅप्ट्न्सी दिल्याने मला काहीही हरकत नाही. आम्हा दोघात कोणताही वाद नाही.