Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर काय म्हणाला विराट?

विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.  

Updated: Dec 15, 2021, 03:45 PM IST
Virat Kohli | एकदिवसीय कर्णधारपद गेल्यानंतर काय म्हणाला विराट? title=

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झाल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. रोहित आणि विराटमध्ये कर्णधारपदावरुन खटकल्याची जोरदार चर्चा रंगू लागल्या. विराटकडून कर्णधारपद काढून घेतलं की त्याने स्वखुशीने राजीनामा दिला, अशा चर्चानाही क्रिकेट वर्तुळात उधाण आलं होत्या. दरम्यान आता कर्णधारपद गेलं की स्वत:ने सोडलं याबाबत स्वत: विराटनेच माहिती दिली आहे. (team india test captain virat kohli give reaction over to odi captaicy and rohit sharma controversy in press confrence)
 
टी 20 टीमची कॅप्ट्न्सी सोडल्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी संघाचं कर्णधारपद करायचंय, असं बीसीसीआयला सांगितलं होतं. मात्र यानंतर निवड समितीने एकदिवसीय कर्णधारपदाबाबत आपल्या मनमानीने निर्णय घेतला, असं विराट म्हणाला. 

विराट काय म्हणाला?

"मी एकदिवयीय सामन्यांसाठी उपलब्ध आहे. मी कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याच्या काही गोष्टी समोर आल्या. या गोष्टी विश्वासार्ह नाहीत. आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या संघ निवडी आधी निवड समितीसोबत माझी फोनद्वारे चर्चा झाली. तु या पुढे एकदिवसीय संघाचा कर्णधार नसणार, असं या निवड समितीच्या 5 अधिकाऱ्यांनी मला सांगितलं. त्यानंतर जो निर्णय झाला तो तुमच्या सर्वांसमोर आहे", असं विराट म्हणाला.

कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच विराटने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस तो बोलत होता. 

"मी कारणं समजू शकतो. बीसीसीआयने योग्य दृष्टीकोनाने हा निर्णय घेतला आहे", अशी प्रतिक्रिया विराटने वनडे कॅप्टन्सीवरुन हटवल्याच्या प्रश्नावरुन दिली.

रोहितसोबत काही खटकलंय का? 

"आमच्या दोघांमध्ये काहीही बिनसलेलं नाही. याबाबत मी गेल्या 2 वर्षांपासून स्पष्टीकरण देतोय. याबाबत बोलून बोलून मी आता थकलोय. माझ्या कोणत्याही कृती आणि निर्णयातून संघाला कमीपणा दाखवण्याचा हेतू नाही", असंही विराटने सांगितलं. 

रोहितची उणीव भासेल

दरम्यान टीम इंडियाला आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मोठा धक्का बसलाय. सलामी फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्याच्या जागी गुजरातच्या प्रियांक पांचालला संधी देण्यात आली आहे.

"दरम्यान रोहित नसल्याने त्याची कसोटी संघात उणीव भासेल", अशी खंत विराटने व्यक्त केली. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. यानंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.