नाईकेच्या किटमुळे टीम इंडिया नाराज, बीसीसीआयकडे केली तक्रार

टीम इंडियानं अधिकृत किट असलेल्या नाईकेविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.

Updated: Aug 22, 2017, 06:18 PM IST
नाईकेच्या किटमुळे टीम इंडिया नाराज, बीसीसीआयकडे केली तक्रार title=

मुंबई : टीम इंडियानं अधिकृत किट असलेल्या नाईकेविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. नाईकेकडून मिळत असलेली किट ही दुय्यम दर्जाची असल्याचं खेळाडूंनी बीसीसीआयला सांगितलं आहे. खेळाडूंच्या या तक्रारीची बीसीसीआयनंही गंभीर दखल घेतली आहे. याबाबत नाईकेच्या अधिकाऱ्यांशी लवकरच बोलू अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सीईओ राहुल झोरींनी सांगितलं आहे

२००६पासून नाईके टीम इंडियला किट देत आहे. २०१६ साली नाईके आणि बीसीसीआयमध्ये नवा करार झाला. १ जानेवारी २०१६ ते ३० सप्टेंबर २०२०पर्यंत हा करार असून नाईके बीसीसीआयला यासाठी तब्बल ३७० कोटी रुपये देणार आहे. नाईके टीम इंडियाच्या प्रत्येक मॅचसाठी ८७ लाख ३४ हजार रुपये खर्च करते.