टीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल!

Team india T20 Captain Hardik Pandya: तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Updated: Dec 30, 2022, 05:02 PM IST
टीम इंडियाचा कर्णधार 'KGF 3' मध्ये दिसणार? रॉकी भाई सोबतचा फोटो होतोय व्हायरल! title=
Hardik Pandya,Actor Yash

Hardik Pandya Meets KGF Star Yash: धमाकेदार अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या केजीएफ (KGF) सिनेमाने भारतीयांना वेडं करून ठेवलं. साऊथचा अभिनेता यश (Actor Yash) याचा लूक सर्वांना आवडला. त्यानंतर केजीएफ 2 ने देखील (KGF 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं दिसलं. अशातच आता केजीएफ 3 सिनेमा (KGF 3) लवकर येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आता आगामी केजीएफ 3 मध्ये रॉकी भाईसोबत (Rocky Bhai) टीम इंडियाचा (T-20 Captain) टी-ट्वेंटी कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दिसणार की काय?, अशी चर्चा होताना दिसत आहे. (team india T20 Captain Hardik Pandya Meets KGF 3 Star Yash with brother Krunal Pandya marathi news)

दोन्ही चित्रपटाने देशातच नाही, तर जगभरात मोठी कमाई केली. त्यानंतर तिसरा भाग देखील (KGF 3) लवकर यावा, अशी चाहते मागणी करत असतानाच हार्दिक पांड्याची (Hardik Pandya Post) एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने सुपरस्टार यशसोबत (Hardik Pandya Meets KGF Star Yash) काही फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा - IND vs SL: हार्दिक पांड्या कर्णधार होताच या खेळाडूला टीम इंडियात संधी, श्रीलंकेला भरली धडकी !

हार्दिक पांड्याने त्याच्या इन्टाग्राम अकाऊंटवरू (Hardik Pandya Instragram) हा फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये केजीएफ 3 चा उल्लेख केला आहे. त्याच्या का कॅप्शनमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता केजीएफच्या आगामी चित्रपटात हार्दिक पांड्या दिसणार की काय?, अशी चर्चा होताना दिसत आहे.

पाहा पोस्ट -

दरम्यान, हार्दिकसोबत कृणाल पांड्या (Krunal Pandya) देखील दुसऱ्या फोटोमध्ये दिसतोय. हार्दिक (Hardik) आणि कृणालने (Krunal) यशसोबत फोटो काढले. या तिघांचा फोटो म्हणून हार्दिकने केजीएफ 3, असा उल्लेख केला असावा, असं दिसतंय. मात्र, सोशल मीडियावर वेगळीच चर्चा होताना दिसत आहे. हार्दिक पांड्या तसा डॅशिंग खेळाडू, हार्दिक चांगली अॅक्टिंग देखील करू शकतो, असं काही चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हार्दिक क्रिकेट (Cricket) सोडून अॅक्टिंग करणार की काय?, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.