ऋषभ पंत IPL मधून होणार बाहेर, 'हा' खेळाडू DC च्या कर्णधारपदाचा दावेदार!

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे देणार याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चांणा उधाण

Updated: Dec 30, 2022, 05:01 PM IST
ऋषभ पंत IPL मधून होणार बाहेर, 'हा' खेळाडू DC च्या कर्णधारपदाचा दावेदार! title=

Rishabh pant car accident : भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतचा अपघात (Rishabh pant car accident) झाला आहे. अपघातामध्ये पंत जखमी झाला असून त्याच्यावर देहरादूनमधील रूग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. दिल्ली-देहरादूनमधील हायवेवरून घरी जात असताना पहाटेच्या वेळी पंतची गाडी दुभाजकाला धडकून अपघात झाला. पंतची कार स्पीडमध्ये असल्याने दुभाजकाला धडकल्यावर चार ते पाचवेळा कारने पलटी मारली. (Rishabh pant car accident these 2 players can replace him delhi capitals a captain ipl 2023 latest marathi sport News)

पंतला दुखापतीतून रिकव्हर व्हायला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे पंत IPL मध्ये खेळेल की नाही याबाबत शंका आहे. यंदाच्या सीझनमध्ये पंतच्या अनुपस्थितीमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ व्यवस्थापन कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे देणार याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएलमधील असा संघ आहे ज्याने अजून एकही विजेतेपद पटकावलं नाही. ऋषभ पंत दिल्ली संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. अपघातामुळे आता दिल्ली नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. यासाठी दोन खेळाडूंची नावे चर्चेत आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाकडे जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

डेव्हिड वॉर्नरने याआधी सनराईजर्स हैदराबादला त्याच्या नेतृत्त्वाखाली आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे. त्यामुळे अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्यावर संघ जबाबदारी देण्याची शक्यता जास्त आहे. वॉर्नरला ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली नाही. पृथ्वी शॉवरही एक युवा भारतीय खेळाडू म्हणून कर्णधारपद दिलं जावू शकतं. 

दरम्यान, पृथ्वी शॉला  अंडर-19 क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव असून तो मुंबई संघाकडून रणजीमध्ये खेळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे.