Team India Schedule : भारतीय टीम आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध (Ind vs Aus) 4 सामन्यांची सिरीज खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाने (Team India) आता तयारीही सुरु केली आहे. याचा पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान यानंतर टीम इंडियाचं ऑगस्टपर्यंतच शेड्यूल जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियानंतर भारत आयरलँडविरूद्ध (IRE vs IND) खेळणार आहे.
आयरलँडविरूद्धच्या सामन्यांसाठी टीम इंडियाची कमान हार्दिक पंड्याच्या हाती सोपवली जाऊ शकते. ही सिरीज 2023 टी 20 वर्ल्डकपला समोर ठेऊन खेळवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया टीम इंडियाचं शेड्युल कसं असणार आहे.
भारत विरूद्ध आयरलँड (IRE vs IND) यांच्यामध्ये गेल्या वर्षी टी-20 सिरीजमध्ये चांगलीच टक्कर पहायला मिळाली. या सिरीजमध्ये हार्दिक पंड्या आणि कंपनीला सिरीज जिंकण्यासाठी नाकीनऊ आणली होती. अशातच आता बीसीसीआयने भारताच्या पुढील शेड्युलची अनाऊसमेंट केली आहे.
क्रिकेट युरोपच्या माहितीनुसार, टीम इंडिया यावर्षी ऑगस्टमध्ये आयरलँडचा दौरा करणार आहे.
नुकतंच न्यूझीलंडच्या टीमला टी20 सिरीजमध्ये नमवत भारताने मोठा विजय नोंदवला होता. टीम इंडियाचा टी-20 इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने आयर्लंडचा 148 रन्सने पराभव केलेला. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा T20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 2010 मध्ये पाकिस्तानने त्याचा 103 धावांनी पराभव केला होता.
गेल्या वर्षी हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्याचबरोबर यावर्षी श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्धची सिरीजही टीम इंडियाने जिंकली आहे.
पहिली टेस्ट- 9 ते 13 फेब्रुवारी, नागपुर
दूसरी टेस्ट- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.
पॅट कमिंस (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स केरी, कॅमरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकप्तान), मिशेल स्वेपसन, डेविड वॉर्नर