ICC Test Ranking: आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Ranking) टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा नंबर-2 वर आली आहे. बुधवारी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 आली होती. मात्र संध्याकाळ होता पुन्हा टीम इंडिया नंबर-2 वर आली. ऑस्ट्रेलिया टीम (Australia Team) आता पुन्हा एकदा नंबर 1 आल्यातं समोर आले. गेल्या महिन्यात देखील आयसीसी वेबसाईटच्या तांत्रिक अडचणींमुळे टेस्ट रँकिंगमध्ये भारत नंबर 1 आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काहीवेळाने पुन्हा टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर गेली.
आयसीसीटी वेबसाईटवर जेव्हा बुधवारी रँकींग अपडेट झाली तेव्हा टीम इंडियाचे 115 रेटिंग्ज पॉईंट्स दाखवले होते. तर ऑस्ट्रेलिया टीमचे 11 रेटिंग्ज पॉईंट्स दाखवले गेले. मात्र संध्याकाळी अचानक यामध्ये बदल झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया 126 अंकांसोबत जगात नंबर 1 बनली होती. तर त्यावेळी भारताचे 115 पॉईंट्स असून दुसऱ्या स्थानावर होता.
त्यामुळे आता पुन्हा एकदा टीम इंडियाचा टेस्ट रँकींगमध्ये नंबर- 1 येण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. टीम इंडिया यापूर्वी 3 वेळा नंबर 1 बनली होती. पहिल्यांदा 1973 मध्ये टेस्टच्या रँकिंगमध्ये भारताने पहिला नंबर पटकावला होता. त्यानंतर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर 2009 मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीमने ही कामगिरी केली होती. तर त्यानंतर विराट कोहली कर्णधार असताना 2016 मध्ये टीम इंडिया टॉपवर पोहोचली होती.
भारतीय टीम आयसीसी वनडे आणि टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत दुपारी जेव्हा रँकिंग अपडेट करण्यात आली तेव्हा भारतीय चाहते फार खुशीत होते. कारण भारत पहिल्यांदाच तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनला होता. मात्र चाहत्यांचा हा आनंद फार काळ टीकला नाही.
जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली टेस्ट जिंकली तर ती टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येऊ शकते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 114 आणि 267 पॉइंट्ससह नंबर-1 वर आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया 112 गुणांसह वनडे क्रमवारीत नंबर-2 टीम आहे.