वेस्टइंडिज पोहचताच टीम इंडियाला समजले की कोच नसणार कुंबळे

 विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडीजला वन डे खेळण्यास इंग्लडवरून रवाना झाली. पण टीम इंडियाच्या कोच पदावरून कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे हे त्यांना वेस्ट इंडिजला गेल्यावर ही माहिती मिळाली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 23, 2017, 03:32 PM IST
 वेस्टइंडिज पोहचताच टीम इंडियाला समजले की कोच नसणार कुंबळे title=

नवी दिल्ली :  विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडीजला वन डे खेळण्यास इंग्लडवरून रवाना झाली. पण टीम इंडियाच्या कोच पदावरून कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे हे त्यांना वेस्ट इंडिजला गेल्यावर ही माहिती मिळाली. 

कुंबळे राजीनामा देणार आणि आपल्यासोबत वेस्ट इंडिजला ड्रेसिंग रूम शेअर करणार नाही हे संघाला बिल्कुल माहिती नव्हते. 

टीम इंडिया मंगळवारी वेस्ट इंडिजला रवाना झाली. त्यावेळी कुंबळे आयसीसीच्या बैठकीसाठी लंडनला थांबला आहे, अशी माहिती टीम इंडियाला देण्यात आली. २५ जूनला दुसऱ्या वनडेनंतर कुंबळे टीम इंडियासोबत असणार आहे असे माहित होते. पण वेस्ट इंडीजला पोहचल्यावर आपले फोन ऑन केले तेव्हा त्यांना ही बातमी धडकली की कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. 

टीम इंडियातील एका सूत्राने सांगितले की, या बातमीने झटका लागला. खेळाडू स्तब्ध होते. तसेच हे समोर आले की राजीनाम्यानंतर कुंबळेने ट्वीट केले की कर्णधाराला त्याच्या स्टाइलवर आक्षेप होता, यावरही टीम इंडियाला धक्का बसला.