मुंबई : श्रीलंकेविरुद्धची टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मासा टी-२० सीरिजसाठी तर मोहम्मद शमीला दोन्ही सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर होते.
जसप्रीत बुमराह हा पाठीच्या फ्रॅक्चरमुळे बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर होता. तर शिखर धवनला वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे आणि टी-२० सीरिज मुकावी लागली होती. रोहित शर्माने २०१९ या वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम केला. तर मोहम्मद शमीने २०१९ या वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक विकेटही घेतल्या.
टीम इंडियाची २०२० सालाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजपासून होणार आहे. ५ जानेवारी, ७ जानेवारी आणि १० जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० मॅच खेळवल्या जाणार आहेत. गुवाहाटी, इंदूर आणि पुण्यामध्ये या मॅच होतील.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मॅच झाल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. १४ जानेवारी, १७ जानेवारी आणि १९ जानेवारीला या ३ वनडे मॅच खेळवल्या जातील. मुंबई, राजकोट आणि बंगळुरुमध्ये या वनडे मॅच होतील.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज झाल्यानंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारत ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह