गरोदर असताना टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने पत्नीला दिला घटस्फोट; दुसरं लग्न केलं आणि...!

लहान पणपासूनच हे दोघं एकमेंकाच्या प्रेमात होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर या खेळाडूच्या जीवनात एक असं वादळ आलं, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं.

सुरभि जगदीश | Updated: Apr 8, 2023, 02:56 PM IST
गरोदर असताना टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने पत्नीला दिला घटस्फोट; दुसरं लग्न केलं आणि...! title=

Dinesh Karthik and Nikita Vanjara Love story: आयपीएलचा 16 वा सिझन सुरु झाला असून गुरुवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा (Royal Challengers Bangalore) पराभव झाला. या सामन्यात आरसीबीत्या दिनेश कार्तिककडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला चांगला खेळ करता आला नाही. रॉयल चॅलेंजर बंगळूरूने दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) 5.50 कोटींना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. दरम्यान दिनेश त्याच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. 

कमी वयात झालं होतं दिनेशचं लग्न

अवघ्या 21 व्या वर्षी दिनेश कार्तिकचं विवाहबंधनात अडकला होता. कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रिण निकिता वंजारा (Nikita Vanjara) सोबत लग्नगाठ बांधली होती. लहान पणपासूनच हे दोघं एकमेंकाच्या प्रेमात होते. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर कार्तिकच्या जीवनात एक असं वादळ आलं, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं.

2007 साली दिनेश कार्तिकने निकितासोबत लग्न केले. मात्र यानंतर 2012 मध्ये दिनेश कार्तिकच्या पत्नीची भेट क्रिकेटर मुरली विजयशी झाली. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. मुरली त्यावेळी कार्तिकच्या घरी देखील यायचा. यामुळे निकिता आणि मुरली यांची ओळख झाली. यानंतर मुरली विजय आणि निकिता एकमेकांना पसंत करू लागले आणि त्यांच्या अफेअरला सुरूवात झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी दिनेश कार्तिकला पत्नी निकिता आणि मुरलीच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा त्याने निकिता वंजारा हिला घटस्फोट दिला. मुख्य म्हणजे ज्यावेळी निकिता प्रेग्नेंट होती. 

निकिताने मुरली विजयशी केलं लग्न

दिनेश कार्तिकने घटस्फोट दिल्यानंतर निकिता वंजाराने पुन्हा लग्न केलं. 2012 मध्ये निकिताने मुरली विजयशी लग्न केलं. 2013 मध्ये निकिता वंजारा (Nikita Vanjara) आणि मुरली विजय (Murali Vijay) यांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. यानंकर पुन्हा 2014 आणि 2017 मध्ये हे दोघंही आई-वडील बनले. याशिवाय 2015 मध्ये भारताची स्क्वॅश क्वीन दीपिका पल्लीकलशी कार्तिकने लग्न केलं.