आफ्रिकेची गोलंदाजी भेदून काढण्यासाठी कर्णधार राहूलसोबत 'हा' खेळाडू करणार ओपनिंग

आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा तर झाली आहे. मात्र कर्णधार राहूलसोबत ओपनिंग कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे नाव समोर येतेय.  

Updated: May 24, 2022, 01:34 PM IST
आफ्रिकेची गोलंदाजी भेदून काढण्यासाठी कर्णधार राहूलसोबत 'हा' खेळाडू करणार ओपनिंग  title=

मुंबई : आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा तर झाली आहे. मात्र कर्णधार राहूलसोबत ओपनिंग कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे नाव समोर येतेय.  

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार आहे. तर भारतीय संघात ओपनिंगलाही केएल राहुल उतरणार आहे. त्याच्यासोबत विस्फोटक फलंदाज केएल राहुलचा सलामीचा जोडीदार बनवण्याची मागणी होत आहे. हा फलंदाज क्षणार्धात सामना फिरवण्यात माहीर असेल, अशी अपेक्षा आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा कर्णधार केएल राहुल सलामीचा जोडीदार इशान किशन (Ishan Kishan) बनण्याची शक्यता आहे.  इशान किशन हा डावखुरा फलंदाज आहे, अशा स्थितीत सलामीला डावखुरे-उजवे कॉंम्बिनेशन लक्षात घेता तो एक चांगला पर्याय आहे. तसेच इशान किशनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिकाही जिंकवून देण्याची क्षमता आहे. ईशान किशनने टीम इंडियामध्ये केएल राहुलला विकेटकीपिंगचा पर्याय असणार आहे. त्यामुळे इशानचे नाव चर्चेत आहे.आता इशानचे नाव फायनल होते का हे पहावे लागेल.  

कधी आहे सामना 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पुढील महिन्यात 9 जूनपासून 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या T20 मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडकर्त्यांनी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम 

टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.

टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.