"झोपेच्या गोळ्या दिल्या तरच टीम इंडियाला हरवणं शक्य"

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Updated: Oct 24, 2021, 03:35 PM IST
"झोपेच्या गोळ्या दिल्या तरच टीम इंडियाला हरवणं शक्य" title=

मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. जर पाकिस्तानला भारतावर विजय मिळवायचा असेल तर त्याला टीम इंडियाच्या खेळाडूंना 'झोपेचं औषध' द्यावं लागेल, असं शोएबने म्हटलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -20 वर्ल्डकपचा महान सामना आज साडेसात वाजता खेळला जाईल.

झोपेचं औषध द्या

शोएब अख्तरने एका मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी संघाला सल्ला दिला होता की, टीम इंडियाला हरवायचं असेल तर भारतीय खेळाडूंना झोपेचं औषध द्यावं लागेल. 

शोएब अख्तर म्हणाला की, "बाबर आझमच्या संघाने भारताच्या सर्व खेळाडूंना झोपेचं औषध द्यावं. याशिवाय अख्तर म्हणाला की, त्याच वेळी त्याला विराट कोहलीला इन्स्टाग्राम चालवण्यापासून थांबवावं लागेल आणि त्याचवेळी मेंटर धोनीने स्वतः येऊन फलंदाजी करण्यापासून रोखलं पाहिजे."

शोएब अख्तरच्या वक्तव्यामुळे माजली खळबळ

शोएब अख्तर म्हणाला, "आधी भारतीय खेळाडूंना झोपेचं औषध द्या. दुसरी गोष्ट विराट कोहलीला दोन दिवस इन्स्टाग्राम चालवण्यापासून थांबवा. तिसरी गोष्ट म्हणजे एमएस धोनी स्वतः फलंदाजीला आला नाही. मी अजूनही सांगतो की तो चांगली फलंदाजी करू शकतो. 

शोए अख्तरने आणखी गंमतीत सांगितलं की, "पाकिस्तानी टीमच्या सलामीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करावी लागेल. पाकिस्तानी संघाला पुढील सल्ला देताना तो म्हणाला की, संघाच्या फलंदाजांना डॉट बॉल खेळण्यापासून थांबवावं लागेल."

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

सुपर -12 मधील टीम इंडियाचे सर्व सामने

  • 24 ऑक्टोबर- भारत विरूद्ध पाकिस्तान
  • 31 ऑक्टोबर- भारत विरूद्ध न्यूजीलंड
  • 3 नोव्हेंबर- भारत विरूद्ध अफगानिस्तान
  • 5 नोव्हेंबर- भारत विरूद्ध स्कॉटलंड
  • 8 नोव्हेंबर- भारत विरूद्ध नामीबिया