BCCI Announced Team India vs New Zealand : श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध तीन टी-20 तीन आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यामधील टी-20 मालिकेच्या संघामध्ये स्टार प्लेअर पृथ्वी शॉला संधी मिळाली आहे. (Team India announcement NZ tour Prithvi Shaws reentry in Team India selected in T20 squad)
पृथ्वी शॉने रणजीमध्ये आसाम विरुद्ध त्रिशतकी खेळी करत निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पृथ्वी शॉ ने 49 चौकार आणि 4 सिक्सरच्या मदतीने 383 चेंडूत 379 धावा फटकावल्या होत्या. शॉ ची निवड होताच त्याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये, 'साईबाबा, मला आशा आहे की तुम्ही सर्व काही पाहत असाल' असं इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं होतं.
पृथ्वीची टीम इंडियामध्ये पुन्हा निवड झाल्यानंतर साई भक्तांनी याची आठवण करून दिली आहे. श्रद्धा सबुरीचं पृथ्वी शॉला सबुरीचं फळ मिळाल्याचं म्हटलं जात आहे. पृथ्वी शॉ मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. 25 जुलै 2021 रोजी तो शेवटच्या टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला होता. शॉ ने टी 20 मध्ये डेब्यु केला होता त्यावेळी तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर शॉची राष्ट्रीय संघ नाहीच तर इंडिया ए टीममध्ये सुद्धा निवड झालेली नव्हती. मात्र आता संघात निवड झाल्यावर त्याला संघातील स्थान पक्क करण्यासाठी संधीचं सोनं करता आलं पाहिजे.
टीम इंडियाचा टी-20 साठी संघ : हार्दिक पंड्या (C), सूर्यकुमार यादव (VC), इशान किशन (विकेटकीप), आर गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (W), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वाय चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक , शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार
पहिली वनडे- 18 जानेवारी, हैदराबाद
दूसरी वनडे- 21 जानेवारी, रायपुर
तीसरी वनडे - 24 जानेवारी, इंदूर
पहिली टी20- 27 जानेवारी, रांची
दूसरी टी20- 29 जानेवारी, लखनऊ
तीसरी टी20- 1 फेब्रुवारी, अहमदाबाद