India vs Pakistan : वर्ल्डकपपूर्वीच भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांना मोठा धक्का, पाहा काय आहे प्रकरण?

टी-20 वर्ल्डकपला आता रविवारपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Oct 14, 2022, 01:08 PM IST
India vs Pakistan : वर्ल्डकपपूर्वीच भारत-पाकिस्तानच्या चाहत्यांना मोठा धक्का, पाहा काय आहे प्रकरण? title=

India vs Pakistan Series: टी-20 वर्ल्डकपला आता रविवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान टीमशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. गेल्या दहा वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्समध्ये सीरीज खेळली गेली नाही. त्याचनुसार आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढील जवळपास 5 वर्षे सीरीज होणं शक्य नाही.

बीसीसीआयने 2023-2027 पर्यंत सर्व स्टेट असोसिएशनला पाठवलेल्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये (FTP) पाकिस्तानचा कॉलम रिकामा ठेवण्यात आलाय. यानुसार टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध पुढे काही सामने खेळणार आहे. 

टीम इंडिया 'या' 5 वर्षांमध्ये 38 टेस्ट यामध्ये 20 मायदेशी, 18 परदेशात, 42 वनडे यामध्ये 21 मायदेशी, 21 परदेशात तर 61 T20 ज्यामध्ये 31 मायदेशी, 30 परदेशी मॅचचा समावेश आहे. भारत सरकारची परवानगी मिळेपर्यंत बीसीसीआय पाकिस्तानसोबत सीरीज खेळण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

शेवटची सीरीज कधी झाली?

जवळपास 10 वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिरीज खेळवण्यात आलेली नाही. पाकिस्तानच्या टीमने शेवटचा 2012-13 मध्ये इंडियाचा दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही टीममध्ये तीन वनडे आणि 2 टी-20 मॅचची सीरीज झाली. त्यावेळी पाकिस्तान टीमने वनडे सीरीज 2-1 अशी जिंकली, तर टी-20 सिरीज 1-1 अशी बरोबरीत राहिली. त्यानंतर केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच दोन्ही टीम्स आमने सामने येताना दिसतात.

भारताचा एकदा पराभव

गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानकडून (Pakistan Team) एकही सामना गमावला नव्हता. वनडे विश्वचषक (world cup) स्पर्धेत सात वेळा आणि टी-20मध्ये पाच वेळा पाकिस्तानचा पराभव केला होता. गेल्या वर्षी तो तुटला. दुबईत झालेल्या T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. त्यानंतर यावर्षी आशिया चषक स्पर्धेत भारताने दोनपैकी एका सामन्यात त्याचा पराभव केला. त्याचवेळी एका सामन्यात पराभव पत्करावा लागला.