Suryakumar Yadav ला 'या' नावाने हाक मारतो विराट कोहली!

 एका व्हायरल झालेल्या व्हीडियोमध्ये कोहलीने सूर्यकुमारबद्दल एक खुलासा केला आहे.

Updated: Oct 14, 2022, 12:31 PM IST
Suryakumar Yadav ला 'या' नावाने हाक मारतो विराट कोहली! title=

मुंबई : ICC T20  वर्ल्डकप आता तोंडावर आला आहे. येत्या रविवारपासून वर्ल्डकपची सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्युकुमार यादवकडून वर्ल्डकपमध्ये चाहत्यांच्या फार अपेक्षा आहेत. आशिया कपमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. दरम्यान टीममध्ये सूर्यकुमार यादवचं आणि विराट कोहलीचं पटत नसल्याच्या देखील अनेक चर्चा रंगल्या होता. दरम्यान एका व्हायरल झालेल्या व्हीडियोमध्ये कोहलीने सूर्यकुमारबद्दल एक खुलासा केला आहे.

या व्हीडिओमध्ये विराट कोहली वेटलिफ्टींग करताना दिसतोय. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्याने एका खास गोष्टीचा खुलासाही केलाय. विराटचा हा व्हीडिओ सूर्यकुमारने शूट केला आहे. यावेळी विराटने कॅप्शन देताना लिहीलंय की, व्हीडिओ क्रेडिट- भाऊ, सूर्यकुमार यादव.

विराट कोहलीचं हे कॅप्शन दोघांच्याही चाहत्यांना फार आवडलं आहे. यानुसार, ऑफ द फील्ड विराट सूर्यकुमारला भाऊ म्हणत असल्याचाही अनेकांनी अंदाज लावला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

मराठीमध्येही केली होती पोस्ट

यापूर्वी एकदा विराट कोहलीने सूर्यकुमारसाठी खास मराठीतून ट्विट केलं होतं. सूर्यकुमारने भारतासाठी उत्तम खेळी केली होती. त्यावेळी कोहलीने सूर्यकुमारच्या धमाकेदार खेळीसाठी लिहिलं, 'मानलं रे भाऊ'. अशा स्टाईलमध्ये कोहलीने सूर्यकुमारचं कौतुक केलं होतं.

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीची ऑनफिल्ड केमिस्ट्रीही चांगली जमताना दिसते. तर ऑफफिल्ड देखील ते चांगले मित्र असल्याचं दिसतंय. टीम इंडियाला 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळायचा आहे