IND vs NZ: भारतीय क्रिकेट संघानं (Team India) मुंबईतील वानखेडे क्रिकेट मैदानावर (Wankhede Stadium) चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या (New Zealand) संघाविरोधात मोठा विजय मिळाला. या विजयामुळं भारतीय संघय 2 कसोटी मालिकांच्या या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडीवर आहे.
भारतीय संघाचा दणक्यात विजय
न्यूझीलंड संघाविरोधात सोमवारी भारतीय संघ मैदानात आला, त्यावेळी अवघ्या 4 विकेट्सची गरज होती. ज्यामुळं यजमानांना विजयी पताका उंचावता येणार होती.
हे लक्षय भारतीय क्रिकेट संघानं अतिशय सहजपणे गाठलं. भारतानं किवींवर 372 धावांनी मात केली. धावांच्या अनुमानानं संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
यापूर्वीचे काही विजय...
372 धावा विरुद्ध न्युझीलंड (2021)
337 धावा विरुद्ध दक्षिण अफ्रिका (2015)
321 धावा विरुद्ध न्युझीलंड (2016)
320 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2008)
India win by 372 runs and take the series 1-0
R Ashwin wraps up the New Zealand innings after Jayant Yadav’s four-wicket haul.#WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8yST5 pic.twitter.com/Z65KX0xCVv
— ICC (@ICC) December 6, 2021
#WTC23 | #INDvNZ pic.twitter.com/63zQ79U12M
— ICC (@ICC) December 6, 2021
अखेरच्या दिवशी जयंत यादवची जादू
भारतीय संघाच्या वतीनं गोलंदाज जयंत यादव आणि आर. अश्विननं प्रत्येकी 4 गडी बाद केले. तर, अक्षर पटेल यानं 1 गडी बाद केला. इथं मोहम्मह सिराज आणि उमेश यादव यांना मात्र गडी बाद करण्यात अपयश आलं.