मुंबई : टी 20 विश्वचषक 2021 यूएईमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. टी -20 विश्वचषकात भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. बीसीसीआयने 8 सप्टेंबरलाच टी -20 विश्वचषक 202 साठी टीम इंडियाची घोषणा केली होती, पण निवडकर्त्यांनी काही खेळाडू निवडण्यात चूक केली आहे असे खेळाडूंच्या खेळण्यावरुन दिसत आहे. आयसीसीच्या नियमानुसार, 10 ऑक्टोबरपर्यंत भारताला टी -20 विश्वचषक संघात बदल करण्याची संधी असेल. त्यामुळे सिलेक्टर्स गरज असल्यास खेळाडू बदलू शकतात.
अशा परिस्थितीत, एक असा खेळाडू आहे. ज्याची निवड टी 20 विश्वचषक 2021 साठी 15 सदस्यीय भारतीय संघात होऊ शकतो. परंतु सध्या या खेळाडूंचा समावेश टी -20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये आहे.
सूर्यकुमार यादवला टी २० विश्वचषकात संधी मिळाल्यापासून त्याचा फ्लॉप शो सुरू आहे. सूर्यकुमार यादवसाठी श्रेयस अय्यरसारख्या प्रतिभावान खेळाडूला टी -20 विश्वचषक संघात निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केले. ज्यामुळे श्रेयस अय्यरला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
आयपीएल 2021 मध्ये श्रेयस अय्यरच्या प्रभावी कामगिरीनंतर, त्याला राखीव खेळाडूंच्या यादीतून काढून टाकून टी 20 विश्वचषक 2021 साठी 15 सदस्यीय भारतीय संघात समाविष्ट करण्याची शक्यता आता वाढली आहे.
टी 20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाला आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये खेळायचा आहे. अशा स्थितीत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे सर्वात मोठे शस्त्र सिद्ध होऊ शकतो, कारण त्याच्या चमकदार कामगिरीने सगळ्या खेळाडूंना चकित करण्याची प्रतिभा त्याच्याकडे आहे.
आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवची खराब कामगिरी सुरूच आहे. ही खराब कामगिरी पाहून चाहतेही खूप निराश झाले आहेत. भारतीय चाहत्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न सतत निर्माण होत असतात. आयपीएलमध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यामुळे सूर्यकुमार यादवला जोरदार ट्रोल केले जात आहे.आयसीसीने जारी केलेल्या नियमांनुसार, संघ व्यवस्थापन अजूनही 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या संघात बदल करू शकते. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवला टी -20 विश्वचषक संघातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.
विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
केएल राहुल
सूर्यकुमार यादव
ऋषभ पंत (विकेटकीपर)
हार्दिक पांड्या
रवींद्र जडेजा
आर अश्विन
वरुण चक्रवर्ती
जसप्रीत बुमराह
भुवनेश्वर कुमार
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर
कोच: रवि शास्त्री.
मेंटर: एमएस धोनी
भारत vs पाकिस्तान- 24 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs न्यूजीलँड- 31 ऑक्टोबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs अफगानिस्तान- 03 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबु धाबी
भारत vs बी1- 05 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
भारत vs ए2- 08 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
सेमीफाइनल 1- 10 नोव्हेंबर, 7:30 PM IST, अबु धाबी
सेमीफाइनल 2- 11 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई
फाइनल- 14 नोव्हेंबर, 7:30 PM IST, दुबई